Loksabha 2024:17 महिन्यांच्या मुलासोबत बेघर, पूजा तडस यांचा गंभीर खुलासा

लोकसभा निवडणूकी अगदी तोंडावर येऊन पडली आहे. तेवढ्यात वर्धा येथील राजकारण तापलं आहे. वर्धा लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने रामदास तडस यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. दरम्यान भाजपते उमदेवार रामदास तडस यांच्यावर त्यांची सून पूजा तडस यांनी आरोप केला आहे. पूजा तडस यांनी शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली आहे.

डिजिटल मार्केटिंग आणि ग्राफिक डिझाइन कोर्सेसना मागणी
सुषमा अंधारे यांच्या पत्रकार परिषद पूजा तडस यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पूजा तडस यांनी सांगितले की, मला कौटुंबिक हिसांचाराला सामना करावा लागला. त्यांनी पुढे सांगितले की, माझ्या मुलाचे बाळ कोण असा प्रश्न विचारण्यात आले आहे. स्वत: रामदार तडस यांनी मला डीएनए तपासण्यास सांगितले. मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझ्यासोबत लग्न करावं लागलं. ज्या प्लॅटमध्ये मी राहत होते तेथे फक्त उपभोग घेण्यात आला. तेथून या बाळाचा जन्म झाला. बाळ जन्माला आल्यानंतर हे बाळ कुणाचं आहे असा प्रश्न विचारण्यात आला. मला नेहमीच अपमानास्पद वागणूक देण्यात आली. प्रत्येक वेळी माझ्यावर आरोप करण्यात आले. ज्या फ्लॅटमध्ये राहायची तो फ्लॅट देखील विकण्यात आला. १७ महिन्याच्या बाळाला बेघर करण्यात आलं. जर तुम्ही एका लहान मुलासोबत राजकारण करु शकता तर माझ्यासारख्या महिलांनी जायचं कुठे

UPSC CMS: UPSC ने अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे, थेट लिंक upsc.gov.in वर उपलब्ध असेल

पूजा तडस यांनी या संतापजनक घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. त्यानंंतर शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे या आक्रमक होऊन परिषदेत बोलल्या की, पूजा तडस या आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहचल्यात. पंतप्रधानांनी महिलेला मदत करावी आणि भाजपने तडस यांची उमेदवारी रद्द करावी. मोदी का परिवार म्हणणाऱ्या भाजपाने मदतीचा हात पुढे करावा अशी विनंती देखील केली.

Explained -भूमिका बदलणाऱ्या विजय शिवतारेंचा अजित पवारांना किती फायदा होईल?

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *