त्या एका फोनमुळे विजय शिवतारे यांची माघार, कुणी केला फोन ?

एक महिन्यापूर्वी पालखी तळावर 10 मार्च रोजी महिला दिनाचा कार्यक्रम होता. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला पाच हजार महिला आल्या होत्या. तिथे मी गेल्यावर मला बारामतीतून लढावं असं जाणवलं. त्यामुळे मी उत्स्फूर्तपणे बोललो. पवार विरोधी 5 लाख 50 हजाराचं मतदान कुणाला होणार? असा विचार मी केला. मतदारांना त्यांच्या चॉईसचा उमेदवार द्यावा म्हणून मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता, असं विजय शिवतारे म्हणाले.
शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर शिवतारे यांनी माघार घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे. विजय शिवतारे यांना एका बड्या नेत्याचा फोन आला. या नेत्याने शिवतारे यांची समजूत काढली आणि शिवतारे यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. स्वत: शिवतारे यांनीच हा गौप्यस्फोट केला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे हा नेता कोण ? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

SBI Recruitment 2024 : स्टेट बँकेत बंपर भरती
शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी सासवडला आज पत्रकार परिषद घेऊन बारामतीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. तसेच निवडणूक न लढवण्याचा निर्णय का घेतला याची माहितीही त्यांनी दिली. मी ऐकत नसल्याने मुख्यमंत्री माझ्यावर रागावले होते. त्याचवेळी खतगावकर यांचा मला एक फोन आला. खतगावकर मला म्हणाले, बापू तुमच्यामुळे मुख्यमंत्र्यांना अडचण होत आहे. महायुतीला अडचण होतेय. सर्व ठिकाणी लोकांनी एकमेकांच्या विरोधात अपक्ष उमेदवार उभे केले तर महायुतीचा फायदा होणार नाही. तुमच्यामुळे कदाचित 10-20 खासदार पडतील. त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे. कोणत्याही स्थितीत शिवतारे ऐकत नाही असं वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटलं तर चालणार नाही. मुख्यमंत्र्यांची आणि महायुतीची अडचण होते. खतगावकर यांनी मला ही परिस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर मीही माघार घेण्याचा निर्णय घेतला, असं विजय शिवतारे म्हणाले.

या बँकेत अधिकारी पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख निघून गेली आहे, आजच अर्ज करा, ही थेट लिंक आहे
तीन तास चर्चा झाली

खतगावकर यांचा फोन आल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यानंतर मुख्यमंत्री मुंबईत आले. नंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी तीन तास चर्चा झाली. यावेळी मी आधी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर मी त्यांना माझं म्हणणं सांगितलं. चर्चा झाली आणि माझ्या मागण्या मान्य झाल्या. त्यानंतर मी माघार घेण्याचा निर्णय घेतला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तरीही निर्णयावर ठाम होतो

गेली 15 दिवस आम्ही कोणत्याही प्रकारे ही निवडणूक लढायचीच असा निर्णय घेतला होता. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेईल असं मी म्हटलं होतं. त्यामुळे माझ्यावर टीकाही झाली. मी वरिष्ठांना खासदार झाल्यावर काय झालं असतं याची माहिती दिली. उपमुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांशी दोनदा भेटून चर्चा झाली. त्यानंतरही मी निर्णयावर ठाम होतो. भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांनीही मला पाठिंबा दिला होता, असंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *