भाजपच्या चित्रपट आघाडीची मोठी कामगिरी.. तंबु चित्रपट मालकांच्या समस्या सोडवण्यात आले यश!
राज्यात अनेक ठिकाणी यात्रा -जत्रा दरवर्षी भरवल्या जातात. जत्रा-यात्राचे मुख्य आकर्षण म्हणजे तंबुतील चित्रपट. तंबुतील चित्रपटांचा आनंद घेणा-यांची संख्या जेवढी अधिक आहे तेवढ्याच चित्रपट दाखवणा-या तंबु मालकांच्या समस्यांची संख्या ही अधिक आहे इतरांना करमणुकीच साधन उपलब्ध करून देणा-या तंबु मालकांच्या समस्या अनेक वर्षा पासून दृष्टी आड होत्या भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट कामगार आघाडीने त्यांच्या व्यर्था समस्या जाणून घेतल्या. मराठवाड्या सारख्या परिसरातील चित्रपट तंबु मालकांच्या एकत्रितकरणाला समीर दिक्षित यांनी सुरूवात केली.
भारतीय जनता पक्ष चित्रपट कामगार मोर्चा आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे, अध्यक्ष समीर दिक्षित यांनी नुकतीच राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवारांची भेट घेतली, तंबु चित्रपट मालकांच्या विविध समस्या मांडल्या त्वरीत निवेदनातील मुद्दे निकाली निघतील असे आश्वासन राज्य मंत्री यांनी दिले. मागील सहा महिन्यापासून चित्रपट आघाडी यावर काम करत आहे .आपल्या महाराष्ट्र राज्याला लोक कला, लोक संस्कृतीची मोठी परंपरा लाभली आहे.
प्रभू श्रीरामावर आधारित देशातील पहिल्या हिंदी पोवाड्याच्या रेकॉर्डिंगचे उदघाट्न मा.श्री .संजय केनेकर यांच्या हस्ते! |
दिक्षित यांनी विविध ठिकाणं विखुरलेल्या तंबु मालकांशी वारंवार संपर्क -संवाद साधून सगळ्यांना एकत्रित केले. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात ऑगस्ट (२०२३ ) महिन्यात मेळावा घेत त्यांच्या समस्या सविस्तरपणे जाणून घेतल्या. पहिल्यांदाच कुणीतरी आपल्या समस्या जाणून घेत आहेत या भावनेने भारावून गेलेल्या तंबु मालकांनी दिक्षित यांचे मनापासुन आभार मानले होते. तंबु मालकांचा विषय चित्रपट कामगार आघाडीने लावून घरला विजय हरगुडे नी विषयांची सविस्तर मांडणी करत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्वाक्षरीचे पत्रक मिळवले.संजय धाडवे( सचिव चित्रपट कामगार आघाडी) यांचे विशेष प्रयत्न होते .आता चित्रपट तंबु मालकांच्या समस्यांचे निराकारण होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट कामगार आघाडी चे हे यश आहे पण विजय हरगुडे तसेच समीर दिक्षित यांच्या सातत्य पुर्ण पाठपुराव्याचे हे श्रेय आहे. अनेक वर्ष दृष्टी आड अश्या चित्रपट तंबु मालकांच्या समस्या अखेरीस भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट कामगार आघाडीने सोडवल्या अशी भावना आज अनेक तंबु चित्रपट मालकांच्या मनात निर्माण झाली आहे.
कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी शास्त्रीय पद्धतीने हळद काढणी कशी करावी?
Latest:
- या छोट्याशा रोपामुळे वाचणार नीलगायपासून पीक, जाणून घ्या शेतकऱ्याचा हा अनोखा प्रयोग
- 100 ग्रॅम फुलकोबीच्या बिया 290 रुपयांना खरेदी करा, जाणून घ्या घरबसल्या ऑर्डर करण्याची सोपी पद्धत
- महाराष्ट्र सरकार छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला कृषी महाविद्यालय उघडणार, आले संशोधन केंद्रही उघडणार
- हे औषध घरीच बनवा आणि गाई-म्हशींना खाऊ द्या, उन्हाळ्यातही दूध कमी होणार नाही.