खा. नवनीत राणा यांनी पोलिसांवर केलेले आरोप खोटे? मुंबई पोलीस आयुक्तांनी व्हिडीओ केला ट्विट
‘मला २३ एप्रिल रोजी खार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. संपूर्ण रात्र मी तिथे होते. यादरम्यान, तहान लागल्याने मी पिण्यासाठी पाणी मागितले पण ते दिले गेले नाही. मी मागासवर्गीय असल्याने इतरजण वापरत असलेल्या ग्लासमधून तुम्हाला पाणी देता येणार नाही, असे ड्युटीवरच्या पोलिसांनी मला सांगितले. हा प्रकार माझ्यासाठी धक्कादायक होता. मला बाथरूमही वापरू दिला गेला नाही. जातीवरून हिणवत माझा छळ करण्यात आला. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली,’ असा दावा नवनीत राणा यांनी लोकसभाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात केला होता.
हेही वाचा : आता ६ ते १२ वयोगटाचे देखील होणार लसीकरण, DCGI ची परवानगी
पहा व्हिडीओ
Do we say anything more pic.twitter.com/GuUxldBKD5
— Sanjay Pandey (@sanjayp_1) April 26, 2022
त्यावर स्पष्टीकरण देत मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे, त्यात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा चहा पिताना दिसत आहे, व्हिडीओ सोबत पोलीस आयुक्तांनी म्हंटले आहे कि, “अजून काही बोलू का” दरम्यान या व्हिडीओ मुळे नवनीत राणा यांनी केलेले आरोप खोटे आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे, तसेच लोकसभाध्यक्षांनी राणा दाम्पत्यांनी केलेल्या आरोपावर पोलिसांचे स्पष्टीकरण मागवले आहे. आयुक्तांच्या या ट्विट नंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागलेले दिसते.