शिंदेंचा नवा डाव, मोठ्या भावाच्या जागांवर घाव, महायुतीत ठिणगी?

२०१९ मध्ये शिवसेनेनं जिंकलेल्या जागांवर भाजपनं दावा सांगत शिंदेंना अडचणीत आणलं. अखेर शिंदेंना महत्प्रयासानं १५ जागा मिळाल्या. भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात वापरलेली व्यूहनीती आता शिंदेसेनेनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वापरण्यास सुरुवात केली आहे.

नवी मुंबईतील विधानसभेच्या दोन्ही जागांवर शिंदेसेना दावा सांगणार आहे. तसा निर्धार शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुलेंनी व्यक्त केला. ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांची मागणी आमचा पक्ष जागावाटपात करेल, असं चौगुले म्हणाले. ऐरोली आणि बेलापूरमध्ये भाजपचे आमदार आहेत. गणेश नाईक ऐरोलीचं, तर मंदा म्हात्रे बेलापूरचं प्रतिनिधीत्व करतात. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. म्हात्रे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या. तर नाईक २०१९ मध्ये भाजपकडून निवडून आले. विशेष म्हणजे म्हात्रे आणि नाईक एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. त्यांच्यात असलेलं विळ्या भोपळ्याचं नातं सर्वश्रृत आहे.

उच्च न्यायालय : मोदी-शहा फेटाळण्याच्या याचिकेवर न्यायाधीश म्हणाले

शिंदेसेनेनं बेलापूर आणि ऐरोली मतदारसंघांवर दावा सांगितल्यानं महायुती खटके उडण्याची चिन्हं आहेत. लोकसभा निवडणुकीचं जागावाटप सुरु असताना शिंदेंचे खासदार असलेल्या अनेक जागांवर भाजपनं दावा सांगितला होता. त्यामुळे शिंदेंची गोची आहे. त्यांना हक्काच्या जागा पदरात पाडून घेताना बरीच कसरत करावी लागली. भाजपनं सर्व्हेंच्या अहवालांचा संदर्भ देत शिंदेंना जेरीस आणलं. अखेर महत्प्रयासानं शिंदेसेनेला १५ जागा मिळाल्या.

आदित्य ठाकरेंनी डिवचलं,शिंदेंनी सुनावलं ..

लोकसभेत शिंदेसेनेची कामगिरी भाजपपेक्षा चांगली झाली. राज्यात सर्वाधिक २८ जागा लढवणाऱ्या भाजपला केवळ ९ जागा मिळाल्या. तर शिंदेसेनेनं १५ जागा लढवत ७ जागा निवडून आल्या. शिंदेंचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा वरचढ राहिला. यानंतर शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी लोकसभेच्या जागावाटपावेळी घडलेल्या घडामोडींचा संदर्भ देत भाजपला लक्ष्य केलं. ‘भाजपनं स्वत:च्या जागा एका फटक्यात जाहीर केल्या, त्याच पद्धतीनं शिंदेसेनेला एकाच वेळी सगळे उमेदवार जाहीर करु दिले असते, तर आमच्या जास्त जागा निवडून आल्या असत्या. आमच्या जागांवर दावे केले गेले. त्यामुळे जागावाटपास विलंब झाला. सर्व्हेंमुळे उमेदवार बदलले गेले. काही ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यास उशीर झाला. कारण जागाच उशिरा सुटल्या,’ अशा शब्दांत त्यांनी भाजपला रडारवर घेतलं होतं

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *