युवासेनेने घेतला पुढाकार, पुंडलीकनगर, भारतनगर भागात पोलीस चौकी उभारण्याची मागणी
भारतनगर, पुंडलिकनगर भागातील सामान्य नागरिकांना या टोळक्याकडून दररोजचा त्रास सहन करावा लागत आहे. याभागात वाढलेली दहशद बघता नागरिकांध्ये रोष आहे. याला युवा सेनेने पाठिंबा देऊन या गुंडाची दहशद संपवण्याचा पवित्रा घेतला आहे. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन या भागात
पोलीस चौकी उभारावी अशी मागणी केली आहे.
औरंगाबाद शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शुभम विनायक मनगटे साईनगर शिवाजीनगर या विद्यार्थ्यावर शनिवारी रात्री दहा वाजता पुंडलिक नगर परिसरात आठ दहा जणांच्या टोळक्यांनी मारहाण केली या मारहाणीत शुभम गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला ७० टक्के पडले होते.
याप्रकरणी शुभमने पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यश पाखरे, शुभम मोरे, अतिश मोरे, निलेश धस, शेख बादशाह, राजू पठाडे आणि आणखी दोन जणांना शनिवारी रात्री यांच्या दुकानावर जाऊन तंबाखू आणि गुटखा फुकट मागितला. फुकट न दिल्याचा राग मनात ठेऊन त्याला घराजवळील रेणुकानगर येथे मोकळया जागी नेऊन बेदम मारहाण केली.
शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर युवा सेनेने आक्रमक भूमिका घेत पोलीस आयुक्त यांना भेटून या भागात पोलीस चौकी द्यावी अशी मागणी केली आहे. युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, हनुमंत शिंदे, संदीप लिंगायत, सागर पाटील , गणेश तेलुरे, किरण तुपे , सागर खर्गे, शेखर जाधव , ज्योतिराम पाटील, अवधूत अंधारे , नंदकुणार म्हस्के , अर्जुन पेरकर ,निलेश उबाळे, मोहित श्रीवास्तव , अजय चोपडे, सुरज शिंदे , गौरव पाटील, योगेश जोशी आदींनी केली आहे.