news

“YoFiMa” फेलोशिप प्रोग्राम तर्फे युवा फिल्म मेकर्स ला मिळणार २५ हजार रुपयांची फेलोशिप…

Share Now

छत्रपती संभाजीनगर – अजिंठा फिल्म सोसायटी – देवगिरी चित्र साधना द्वारा चित्रपट क्षेत्रात करिअर करु इच्छित खान्देश – मराठवाड्यातील युवकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून कार्यरत देवगिरी चित्र साधना द्वारा एक दिवसीय अभ्यासवर्गाचे आयोजन दि.२७ जुलै रोजी करण्यात आले. १८ ते २५ वयोगटातील खान्देश – मराठवाड्यातील युवकांना लघुपट निर्मितीसाठी , २५ हजारापर्यंत फेलोशिप देऊन प्रोत्साहित करण्यात येईल.या सोबतचं इच्छुक फिल्म मेकर्स यांना ऑनलाइन किंवा ऑफलाईन माध्यमाद्वारे कार्यशाळा घेण्यात येतील.

ऑगस्टमध्ये 13 दिवस बँकांमध्ये राहणार सुट्टी, अडचणी टाळण्यासाठी आजच करा नियोजन


या वेळी सुप्रसिद्ध अभिनेते,लेखक, दिग्दर्शक प्रा.योगेश सोमण प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. पहिल्या सत्रात प्रारंभी प्रा.डॉ. जयंत शेवतेकर यांनी प्रास्ताविक व श्री. योगेश सोमण यांचा सत्कार करत कार्यशाळेचा प्रारंभ केला .चित्र साधनाचे संयोजक श्री.किरण सोहळे यांनी देवगिरी चित्र साधना कार्यपरिचय करुन दिला. दुसऱ्या सत्रात प्रा.सोमण यांनी चित्र साधनेच्या कामाची आवश्यकता व कार्यकर्ता विकास या विषयात मार्गदर्शन करत आगामी काळात चित्र साधना कुठले उपक्रम राबवु शकते या विषयी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात चित्र साधना प्रांत टोळी सदस्य प्रा.डॉ.जयेंद्र लेकुरवाळे यांनी चित्र साधनेच्या आगामी कार्यक्रमांची माहिती देत यावर्षी पासून सुरू होणाऱ्या युवा चित्रकर्मी शिष्यवृत्ती योजनेची माहिती देत चतुर्थ देवगिरी फिल्म फेस्टिव्हल आयोजनाबाबद विचार मांडले.

महाराष्ट्राच्या ‘माझी लाडकी बहिन योजने’ला वित्त विभागाचा विरोध आहे का? असे उत्तर अजित पवार यांनी दिले

सत्र – ४
या सत्रात चित्रपट निर्मिती प्रक्रियेचे टप्पे लेखन, कथा,पटकथा,संवाद, गीत,दिग्दर्शन या विषयी प्राथमिक माहिती दिली. या सत्रात व्यासपीठावर जेष्ठ अभिनेते डॉ. दिलीप घारे,दिग्दर्शक श्री.संतोष जोशी, जेष्ठ नाट्यकर्मी श्री. पद्मनाभ पाठक,एम. जी.एम.विद्यापीठाच्या फिल्म मेकिंग विभागाचे संचालक प्रा.शिवदर्शन कदम,चित्रपट आघाडी चे प्रमुख श्री.सचिन अनर्थे , चित्रपट समिक्षक श्री. अजिंक्य उजळांबकर यांनी उपस्थितांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली.
अभ्यासवर्गाच्या समारोप सत्रात डॉ.जयंत शेवतेकर यांनी चित्र साधनेच्या उपक्रमात सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन केले. डॉ.जयेंद्र लेकुरवाळे यांनी आभार व्यक्त केले.

सांगलीतील कृष्णा नदीच्या पातळीत वाढ पुणे नंतर सांगलीत पुराचा धोका.


चित्र साधनेच्यावतीने प्रा.योगेश सोमण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.चित्र साधना सह संयोजक श्री.विनीत जोशी, सह संय़ संयोजक प्रा.सुचित्रा लोंढे, विभाग संयोजक श्री.स्वप्नील केंद्रे,सदस्य अँड. चैतन्य धारुरकर श्री.ह्रषिकेश होशिंग,श्री.नकुल सोनवणे यांच्या सह ५५ चित्रपट कर्ते अभ्यासवर्गात उपस्थित होते.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *