तरुणीची वस्तीगृहात आत्महत्या ; सुसाईट नोटमुळे खरं कारण समोर आलं
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीने हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. या तरुणीने आत्महत्येपुर्वी सुसाईट नोट लिहून वडिलांची माफी मागितली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, वैष्णवी रमेश काकडे (वय २२) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
ही तरुणी सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथील आहे . तरुणीने आत्महत्या केल्याचे शनिवार २६ मार्च रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आले. आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.
शहरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटी परिसरात जुब्ली पार्क इथं वैष्णवी काकडे आणि पाच मुली राहत होत्या. यातील तीन मुली काही दिवसांपूर्वी गावी गेल्या यामुळे वैष्णवी आणि दोन मैत्रिणी शुक्रवारी २५ रोजी खोलीत होत्या. दरम्यान रात्री जेवण झाल्यानंतर तिघींनी समोरच्या खोलीत झोपण्याच ठरवलं. रात्री दोन वाजता दोन्ही मैत्रिणी झोपी गेल्या.
यावेळी वैष्णवीने ‘मी फोनवर बोलते, तुम्ही झोपा’ असे सांगितले. यामुळे दोन्ही मैत्रिणी झोपी गेल्या. यावेळी वैष्णवी फोनवर कोणाशी तरी भांडत सुरू असल्याचा मैत्रिणींना आवाज आला. मात्र वैष्णवीचे तीन दिवसांपासून असेच वाद सुरू असल्याने त्यांनी दुर्लक्ष केलं.
शनिवार २६ मार्च रोजी सकाळी दहा वाजता एक मैत्रीण उठून मागे चार्जर घेण्यास गेली असता वैष्णवीने गळफास घेतला असल्याचे आढळून आले. तिने ही बाबा मैत्रिणींना सगितली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांच्या मदतीने वैष्णवीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. आत्महत्येआधी तिने ३ पाणी सुसाईट नोट लिहिली होती. यामध्ये तिने आपण डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही, बाबा मला माफ करा, असं पत्रात नमूद केलं आहे. वैष्णवी ही औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय कर्करोग रुग्णालय आणि महाविद्यालयात तिसऱ्या वर्षात शिकत होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.