‘पपा त्यांना सोडू नका’ असे म्हणत तरुणीची आत्महत्या
मुंबई : सध्या तरुणाच्या आत्महत्येचे प्रमाण राज्यात वाढत आहे. अशीच एक घटना मुंबईत घडली. जोगेश्वरीतील जान्हवी विजय चव्हाण या एकवीस वर्ष्याच्या तरुणाने आत्महत्या केली आहे. तसेच जान्हवी एक सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. त्यात तिने ‘ ‘पपा त्याला सोडू नका, यात सगळे पुरावे आहेत’ असे लिहत मोबाईलचा पासवर्ड देखील लिहून ठेवला आहे. रविवारी हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात मेघवाडी पोलिसांनी निखील नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
जान्हवी जोगेश्वरीच्या रामवाडी परिसरात आपल्या वडिलांसोबत राहात होती. दोन वर्षांपूर्वी तिच्या आईचं निधन झाल्यानं तिच्या मोठ्या भावाचं लग्न लावून देण्यात आलं. हा भाऊ सध्या विरारला असतो. जान्हवी अंधेरीतील कोरोना लसीकरण केंद्रात अटेन्डंट म्हणून काम करायची. तर तिते वडील पालिकेतील जल विभागात फिटर म्हणून काम करत असल्याने कामानिमित्त सतत बाहेर असायचे. याच कारणामुळे अनेकदा जान्हवी घरी एकटीच असायची. शनिवारी रात्री जेव्हा जानव्हीचे वडील घरी आले तेव्हा अनेक वेळा दार वाजवूनही दार का उघडत नाही म्हणून त्यांनी खिडकीतून पहिले. जेव्हा जान्हवीने गळफास घेतला हे कळले.
दरम्यान पोलिसांनात्यांनी सर्व घटनेची माहिती दिली, हाती आलेल्या माहिती नुसार जान्हवीच्या सुसाईड नोटमध्ये अक्षया आणि निखिल या बहीण भावाने मला फसवले आहे. असे देखील लिहिलेले आहे.