तपोवन एक्सप्रेसमध्ये तरुणाची आत्महत्या

नांदेड : नांदेड रेल्वे स्टेशनवर आज सकाळी हृदयद्रावक घटना घडली. रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या तपोवन एक्सप्रेच्या खिडकीला बाहेरच्या बाजूने गळफास  घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.नेहमी प्रमाणे तपोवन एक्सप्रेस मुंबईकडे निघण्यापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उभी होती. गाडीच्या एका बोगीच्या खिडकीला लटकून तरुणाने आत्महत्या केल्याचे प्रत्यक्षदर्शींना आढळून आले. त्यानंतर याविषयीची माहिती तत्काळ रेल्वे स्टेशन पोलीसांना देण्यात आली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे वय २५ वर्षांच्या आसपास असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. मयत कुणाचा परिचित असल्यास लोहमार्ग पोलीस नांदेड किंवा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया मेलफेदेवार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदर मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

बुधवारी सकाळी तपोवन एक्सप्रेस मुंबईकडे निघण्यापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर यार्डमध्ये उभी होती. या गाडीच्या एक डब्यातील शौचालयाच्या बाहेरच्या बाजूने खिडकीला मोठ्या रुमालाने अनोळखी युवकाने आत्महत्या केल्याचे दिसून आले. ही माहिती लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांना रेल्वे प्रशासनाने कळवली. त्यानंतर उनवणे यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया मेलफेदेवार या घटनास्थळी दाखल झाल्या. सदर मृतदेह रेल्वेच्या खिडकीवरून खाली उतरवून पंचनामा करून तपासणी करण्यात आली. सदर इसमाच्या खिशात ओळख पटवणारे काहीही पुरावे सापडले नाहीत. मात्र तो २५ वर्षे वयाचा असावा, असा अंदाज बांधण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *