क्राईम बिट

मित्राच्या बहिणीसोबत जुळले सूत ; भावाने केला धावत्या दुचाकीवर खून

Share Now

बीड :- बहिणीच्या प्रियकराची तरुणाने धावत्या दुचाकीवर अंधारात चाकूने सपासप वार करून हत्या केली. हा थरार २२ मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील मंझेरी शिवारातील शांतिवननजीक घडला, हत्येनंतर त्याच दुचाकीवरून पळून गेलेल्या मारेकऱ्यास बीड ग्रामीण पोलिसानी १४ तासानंतर जेरबंद केले.

ब्रह्मदेव हनुमान कदम (२६, रा. मंझेरी, ता.बीड) असे मयताचे नाव आहे. तो अविवाहित असून शेती करत होता. गावातीलच सिध्देश्वर उर्फ लक्ष्मण पांडुरंग बहिरवाळ (रा. मंझेरी ता.बीड) हा त्याचा मित्र आहे. सिध्देश्वरची बहीण नांदत नसल्याने माहेरीच असते. ब्रह्मदेव व सिध्देश्वर हे दोघे मित्र असल्याने एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. असायचे.

हेही वाचा :- आई आणि भावामुळे पोटच्या मुलाला सोडलं ; अनैतिक संबंधातून मुलाचा जन्म

यातून सिध्देश्वरची बहीण व ब्रह्मदेवचे सूत जुळले. त्यांच्या प्रेम प्रकरणाची भणक सिध्देश्वरला लागली होती. तेव्हापासून त्याच्या मनात ब्रह्मदेवबद्दल राग होता. २२ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता ब्रह्मदेव हा समाधान भंडाणे व बचन बहिरवाळ यांच्यासमवेत जेवणासासाठी मंझेरी
फाट्यावर गेला होता.

हेही वाचा :- प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

पंधरा मिनिटांनी सिध्देश्वर तेथे पोहोचला. त्यानंतर तिघे दोन दुचाकीवरून गावी जाण्यास निघाले. समाधान भंडाणे व वचन बहिरवाळ एका दुचाकीवर, तर ब्रह्मदेव सिध्देश्वर बहिरवा दुसऱ्या दुचाकीवर होते. दुचाकी चालवित होता, तर सिध्देश्वर मागे बसला होता. शांतिवनजवळ चढावर सिध्देश्वर बहिरवाळने ब्रह्मदेवच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. ब्रह्मदेवचा भाऊ बाबा हनुमान कदम यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण ठाण्यात सिध्देश्वर बहिरवाळवर २३. मे रोजी पहाटे गुन्हा नोंदविला.

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देते 10 लाखांचे कर्ज, विना गॅरंटी, जाणून घ्या अर्ज कसा करावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *