कोरोना अपडेट

चिंताजनक – मुंबईत आठ हजार कोरोना रुग्णाची भर

Share Now

आज मुंबई शहरातील कोरोना रुगांच्या संख्येने आठ हजाराचा आकडा पार केला आहे, दररोज वाढणारी रुग्ण संख्या नागरीकांच्या चिंतेत भर घालत आहे. यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता विनाकारण फिरणे टाळायला हवं, मास्कचा वापर करणं आणि लस घेतली नसेल तर लस घेणं देखील महत्त्वाच आहे.

राज्यातील कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे, आज मुंबई ८०८२ नवीन रुग्ण आढळून आले तर दोन कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज मुंबईतील ६२२ कोरोनामुक्त झाले असून हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच शहरातील सक्रिय रुग्णाची संख्या ३७२७४ असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *