प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा
उमरगा :- शहरातील काळे प्लॉट भागात रविवारी एका ३८ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. यावेळी संशयित म्हणून पोलिसांनी मयताची पत्नी, सासू व एका पालिका कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले होते.
पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनीच खून केल्याचे कबूल केले असून, सोमवारी त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायलयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सिद्धू शिवराज पवार (वय ३८) हे आपल्या पत्नीसह काळे प्लॉट भागात राहत होते. सिद्धू हा अॅटोरिक्षा चालवित होता, तर त्याची पत्नी ज्योती (वय ३०) ही लग्नसमारंभात स्वयंपाक करण्यासाठी मजुरीवर जात होती. गेल्या वर्षभरापासून घराजवळ राहणाऱ्या व नगरपरिषदेत कर्मचारी असणाऱ्या धनराज याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध जळले होते. याबाबत सिद्धू यास माहिती झाल्यानंतर त्याने पत्नीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु पत्नीने दुर्लक्ष केले.
हेही वाचा :- संभाजीराजे शिवबंधन बांधणार ? यावर संभाजीराजे छत्रपती याच सूचक व्यक्तव्य
शनिवारी सिद्धू हा रात्री अकरा वाजेच्या सुमारास घरी आल्यानंतर याच कारणावरून पती पत्नीत कुरबुर झाली. त्याचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. यावेळी पत्नीने रात्री एक वाजेच्या सुमारास प्रियकर नागरिकांकडून धनराज यास फोन करून बोलावून घेतले. यावेळी पत्नी ज्योती सासू अल्पवयीन मुलगा व प्रियकर धनराज यांनी सिद्धला मारहाण केली.
धनराज याने तोंडावर उशी ठेवून गळा झाल्यानंतर दाबला तर पत्नी, सासूने व मुलाने त्याचे परंतु, पत्नीने हात पाय धरले. यात सिद्धू याचा मृत्यू झाला .
यावेळी मयताचे वडील यांनी सुनेवर संशय व्यक्त केला. तसेच श्वानपथक आल्यानंतर त्यानेही धनराज याच्या घराचा माग काढला. परिसरातील नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पत्नी, सासू, मुलगा व प्रियकराला ताब्यात घेतले. आरोपींनी खून केल्याचे कबूल केले.
सरकारी नोकरी: सहकारी बँकेत नोकरी करायची तुम्ही पदवीधर आहात, लवकर करा अर्ज मिळेल चांगला पगार