महाराष्ट्रराजकारण

आता किराणा दुकानात मिळणार वाईन ? आज होणार बैठक

Share Now

मुंबई : आता वाईन जर तुम्हाला किराणा, जनरल स्टोर, सुपर मार्केट मध्ये दिसली तर आचार्य चकित होऊ नका. कारण महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकार हा निर्णय घेऊ शकते. आज होणाऱ्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय होणार आहे. आज दिनांक २७ जानेवारी रोजी होणाऱ्या बैठकीत या संबंधी चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत इतर अनेक महत्वाच्या विषयांवर देखील चर्चा केली जाणार आहे.

दरम्यान, भाजपकडून या वाईन प्रस्तावाला विरोध असल्याचे देखील भाजपने जाहीर केले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने वाईन विक्रीबाबत नवा प्रस्ताव मान्य केल्यास भाजपकडून मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. आता या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय योग्य असला तरी देखील याला कितपत प्रतिसाद मिळेल याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *