VIDEO |आजच ‘वर्षा’ वरून ‘मातोश्री’ला मुक्का हलवणार ? राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य
महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच सारीपाटाचा खेळ पाहायला मिळत आहे, आज राजकीय वर्तुळ अनेक घटना घडल्या त्यातलं एक म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद, बोलताना मुख्यमंत्री सद् घालण्याच्या स्वरात बोलत असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सुरु असलेल्या राजकीय घटनांवर वक्तव्य देखील केलं. शरद पवार आणि कामालनाथ यांनी त्यांना फोन केल्याचे सांगितले, कमलनाथ आणि पवार त्यांच्या सोबत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. तसेच माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेही ते म्हणाले, ज्यांना मी मुख्यमंत्री नकोय त्यांनी समोर येऊन सांगावा, माझ्या समोर बसा आणि मग बोला त्यांनी यावं आणि राजीनामा घेऊन जावा, असेही मुख्य मंत्री म्हणाले.
काय म्हणाले मुख्यमंत्री पहा
दरम्यान, बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, असे म्हणणाऱ्या वाटणाऱ्या लोकांनी माझ्या समोर यावं,एकनाथ शिंदे आणि त्याच्या सहकार्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच आवाहन दिले. पदे येतात आणि जातात मात्र पदावर बसल्यावर जनतेनी जे प्रेम दिल तीच आयुष्याची कमाई आहे. संख्या किती कुणाकडे आहे, यापेक्षा ती संख्यह काशी आहे. असेही सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवलेल्या अटी एकनाथ शिंदे यांनी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना दिल्या आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतची युती तोडण्याची पहिली अट आहे. दुसरी अट भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची आहे, मात्र उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांची कोणतीही अट मानायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत शिंदे शिवसेनेत परतले नाहीत तर उद्धव ठाकरे सरकारवर संकट आणखी गडद होणार आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटही लागू होऊ शकते का? मात्र, शिंदे यांनी शिवसेना न सोडल्याचे बोलले आहे.