आता आता समूह iphone चे उत्पादन करणार?
अॅपलच्या आयफोनची निर्मिती भारतीय कंपनीच्या भारतातील प्लांटमध्ये होऊ शकते. टाटा समूहाची अॅपलला आयफोनचा पुरवठा करणारी तैवानची कंपनी विस्ट्रॉन कॉर्पशी चर्चा सुरू आहे. टाटा समूहाला तैवानच्या कंपनीसोबत भारतात एक संयुक्त उपक्रम बनवायचा आहे. हा संयुक्त उपक्रम भारतात आयफोनची निर्मिती करेल.
ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीयचे भारताशी कसे होते संबंध ?
टाटा समूहाला तंत्रज्ञान निर्मिती क्षेत्रात आपले पाऊल टाकायचे आहे. यासाठी त्याला विस्ट्रॉन कॉर्पच्या कौशल्याचा फायदा घ्यायचा आहे. विस्ट्रॉनकडे उत्पादन विकास, पुरवठा साखळी आणि असेंब्लीमध्ये कौशल्य आहे. टाटा समूहाची विस्ट्रॉनसोबतची चर्चा यशस्वी झाल्यास, आयफोन बनवणारी टाटा ही पहिली भारतीय कंपनी बनेल. सध्या, विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन टेक्नॉलॉजीसारख्या तैवानच्या कंपन्या चीन आणि भारतात आयफोन बनवतात.
पशुपालकांनो सावधान : लंपी वायरसमुळे या राज्यातील,डझनहून अधिक गायी एकाच खड्ड्यात पुरल्या जातायत
भारतीय कंपनीला आयफोन बनवण्याची संधी मिळाली तर भारत चीनच्या सार्वभौमत्वाला आव्हान देऊ शकतो. सध्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात चीनचे वर्चस्व आहे. दुसरीकडे, कोरोनामुळे लॉकडाऊन आणि अमेरिकेसोबतचे बिघडलेले संबंध याचा परिणाम चीनच्या उत्पादनावर झाला आहे.
टाटा समूह भारतातील उत्पादनासाठी इतर इलेक्ट्रॉनिक ब्रँडशीही वाटाघाटी करू शकतो. यामुळे चीनवरील इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांचे अवलंबित्व कमी होईल. वाढत्या भू-राजकीय जोखीम लक्षात घेता, कंपन्यांना त्यांचे चीनवरील अवलंबित्व कमी करायचे आहे.
टाटा समूह विस्ट्रॉनमधील भागभांडवल खरेदी करू शकतो किंवा दोन्ही कंपन्या संयुक्तपणे भारतात नवीन प्लांट उभारू शकतात. पुरवठा आणि उत्पादनाच्या बाबतीतही अॅपलला चीनवरील अवलंबित्व कमी करायचे आहे. त्याला भारतात आपली पुरवठा साखळी मजबूत करायची आहे. अॅपलकडे आशियाई देशांतील कंपन्यांसोबत आयफोन पुरवण्याचे कंत्राट आहे. आयफोनचे उत्पादन हे एक गुंतागुंतीचे काम आहे, कारण उत्पादक कंपनीला ऍपलच्या कठोर मुदती आणि गुणवत्ता नियंत्रणांचे पालन करावे लागते.
टाटासोबत विस्ट्रॉनची चर्चा यशस्वी झाल्यास भारतातील आयफोनचे उत्पादन पाच पटीने वाढेल. टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी टाटा समूहाचे इलेक्ट्रॉनिक्स आणि हायटेक उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिले होते. सध्या टाटा समूहाच्या बहुतांश व्यवसायात सॉफ्टवेअर, स्टील आणि कारचा वाटा