शाळा लवकरच सुरु होतील? आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती
मुंबई : वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळे शाळा आणि महाविद्यालय येत्या १५ तारखे पर्यंत बंद आहे. यावर शाळा कधी सुरु होणार असे पालक आणि विध्यार्थी प्रतीक्षा करता आहे. यावर आरोग्य मंत्री यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले १५ ते १८ वयोगटातील ४२ टक्के विद्यार्थ्यांचे लसूकरण झाले आहे. तसेच शाळा सुरु करण्याच्या निर्णया बाबद १५ दिवसांनी पुनर्विचार करण्यात येईल. शाळा सुरु व्हाव्या कि नाही यावर दोन मतप्रवाह दिसत आहे.
आजचा दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे. आपण ९० टक्के जनतेला पहिला तर ६२ टक्के जनतेला दुसरा डोस दिलेला आहे. असे म्हणत त्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. ज्यांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही अशांची जनजागृती करून त्यांनाही लसीकरण देऊ असे यावेळी टोपे यांनी सांगितले.
तसेच शाळा बंद असल्याच्या कारणाने अनेक पालक नाराज आहे. अनेकांचे म्हणणे आहे कि या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच महाविद्यालयीन विध्यार्थी देखील निराश झाले आहे. यावर अभियांत्रिकेच्या विध्यार्थ्यानी देखील आमच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे काय? असा प्रश्न उपस्तित केलेला आहे.