संभाजीराजे शिवबंधन बांधणार ? यावर संभाजीराजे छत्रपती याच सूचक व्यक्तव्य
राज्याच्या राजकारणात राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवरून शिवसेना माघार घ्यायला तयार नाही, शिवसेनेच्या वतीने संभाजीराजे छत्रपती याना आधी शिवबंधन आणि मगच उमेदवारी अशी अट घातली आहे. यावर आज कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण याआधी सविस्तर चर्चा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे छत्रपतींचा सन्माम राखतील अशी अपेक्षा असल्याचे वक्तव्य संभाजी राजे यांनी सांगितले . संभाजीराजेंच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाबाबत आता पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा :- तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलच्या आज किमती काय ? जाणून घ्या
संभाजीराजेंनी सांगितले की, माझी मुख्यमंत्री उद्धवजींशी सविस्तर चर्चा झाली आहे . पुढे काय करायचं ते सविस्तर ठरलेलं आहे. मला पूर्ण विश्वास आहे ते त्याप्रमाणे करतील, मला हा ही विश्वास आहे की ते छत्रपती घराण्याचा सन्मान करतील असे वक्तव्य संभाजीराजे यांनी बोलताना केले.
संभाजीराजे छत्रपती यांनी पॅलेसमध्ये आज मालोजीराजे यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांना संवाद साधला . संभाजीराजे आज मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. संभाजीराजे आजच मुंबईत जाणार आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी सहावी जागा ही आपल्याला द्यावी, अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर चर्चेचा धुरळा उडाला.
शिवसेनेने संभाजी राजेंनी पक्षात प्रवेश करावा त्यानंतर उमेदवारी जाहीर करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर संभाजीराजे यांच्यावर दबाव वाढला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सरकारी नोकरी: सहकारी बँकेत नोकरी करायची तुम्ही पदवीधर आहात, लवकर करा अर्ज मिळेल चांगला पगार