महाराष्ट्रराजकारण

संभाजीराजे छत्रपती शिवसेनेची ऑफर स्वीकारणार ?

Share Now

शिवसेनेत या अन् मगच राज्यसभेची उमेदवारी आपल्याला देण्याचा विचार निश्चितपणे करू असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना सांगितले आहे. स्वत: उद्धव ठाकरे यांनीच शिवसेनेच्या शुक्रवारी झालेल्या आमदारांच्या बैठकीत ही माहिती दिल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या शिवसेना समर्थित आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी राज्यसभेची सहावी जागा निश्चितपणे लढवेल असे सांगितले, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचा एका जागेवर विजय निश्चित आहे. परंतु शिवसेनेने दुसरी जागा लढविल्यास राष्ट्रवादी व काँग्रेसचा आपल्याला पाठिंबा राहील, असा विश्वास उद्धव ठाकरे याना आहे .

संभाजीराजे छत्रपती आपल्याला भेटायला आले होते. महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा अशी विनंती त्यांनी केली. आधी शिवबंधन बांधा, असे आपण त्यांना सांगितले. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून लढण्याची तयारी त्यांनी दर्शविली. पण ते मान्य नसल्याचे शिवसेना सहयोगी आमदारांच्या आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले.

भाजपच्या माजी आमदार पती पत्नीविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल

या बैठकीला राज्यमंत्री बच्चू कडू, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडे, किशोर जोरगेवार, विनोद अग्रवाल, मंजुळा गावित आणि गीता जैन हे आमदार उपस्थित होते. संभाजीराजे किंवा बाहेरच्या उमेदवाराला संधी देण्यापेक्षा शिवसेनेतीलच नेत्याला संधी द्या, असे साकडे बहुतेक आमदारांनी ठाकरे यांना घातले. आपण घ्याल त्या निर्णयासोबत राहू, अशी ग्वाही या आमदारांनी ठाकरे यांना दिली. निधीवाटपासंदर्भात अन्याय होणार नाही याची काळजी मी स्वतः घेणार आहे. असे यांनी सांगितले.

संजय राऊत २६ मे रोजी उमेदवारी अर्ज भरणार
शिवसेनेतर्फे संजय राऊत यांना पुन्हा एकदा राज्यसभेची संधी दिली जाणार असून . तीनवेळा राज्यसभा सदस्य असलेले राऊत यांना चौथी संधी दिली जात आहे. २६ मे रोजी ते उमेदवारी अर्ज भरतील अशी शक्यता आहे.

हे ही वाचा (Read This) उन्हाळ्यात ताजेतवाने करणारे पेय: बनवा लिंबू आणि पुदिन्याचे हे थंड पेय, कसे बनवायचे ते जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *