मनसे अध्यक्ष राज यांनाही केंद्राकडून सुरक्षा मिळणार ? यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळावा आणि त्यानंतर ठाण्यात झालेली उत्तर सभा यात गाजलेला मुद्द्दा म्हणजे मशिदीवरील भोंगे यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता तापलं आहे. तसेच राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ होण्याची शक्यता असून केंद्र सरकारकडून त्यांना सुरक्षा दिली जाणार आल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा :- मनी लॉन्ड्रींगमुळे ‘या’ बड्या कंपनीची तब्बल 757 कोटीची मालमत्ता जप्त

यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच “राज्य सरकार नियमांनुसार सुरक्षा पुरवत असतं, राजकीय निर्णय नसतो,” राज्यातील अनेक नेत्यांना मिळालेल्या केंद्राच्या सुरक्षेबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मत व्यक्त केले आहे.

हेही वाचा सोशल मिडीयावर सामाजिक तेढ निर्माण करणारे मुंबई पोलिसांच्या रडारवर

मनसे अध्यक्ष राज यांनाही केंद्राकडून सुरक्षा मिळणार असल्याची सांगितले जात आहे याविषयी अमित शहांना पत्र लिहिणार

राज ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्राद्वारे केली होती. त्यावर अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारला पत्र लिहिणार आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही याबाबत पत्र देणार असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

हेही वाचा :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकारकडून -सुरक्षा पुरविली जाण्याची शक्यता

यापूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनाही केंद्राकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली . या प्रश्नावर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, “अलिकडे राज्याच्या सार्वभौम अधिकाराला बाजूला सारुन काही व्यक्तींना केंद्राकडून सुरक्षा पुरवली जाते. हे राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. या राज्यातील सर्व नागरिकांचं रक्षण करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे. परंतु ठीक आहे केंद्र सरकारचा अधिकार आहे, ते सुरक्षा देऊ शकतात. आता त्या सुरक्षेचा वापर कसा करायचा हे त्यांनी ठरवायचं.”

हे ही वाचा (Read This) या सोप्या पद्धतीने करा उत्तम कंपोस्ट खत तयार !

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *