कोरोना अपडेटमहाराष्ट्र

महाराष्ट्रात आता मास्क वापरणे सक्तीचे असणार का? काय म्हणाले राजेश टोपे

Share Now

मुंबई : राज्यात कोरोना आता नाहीसा झाला आहे. अनेक शहारत कोरोना बाधितांची संख्या दोन आकडी दिसत आहे. यामुळे विविध संघटनांकडून राज्य शासनाकडे मास्क आणि निर्बंध हटवण्याची मागणी देखील करण्यात येत आहे. यासंदर्भातील निर्णय महाराष्ट्रातील टास्क फोर्ससोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन आरोग्यमत्री  राजेश टोपे यांनी दिलं आहे. येत्या २ एप्रिल गुढीपाडवा आहे, तोपर्यंत तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं टोपे यांनी सांगितलं. मात्र गुढीपाडव्याला आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी वैयक्तिकपणे गुढी उभारण्याची परंपरा असून त्या उत्साहाला कुठेही निर्बंध नाहीत. नागरिकांनी हा सण उत्साहाने साजरा करावा, असं टोपे यांनी सांगितलं. तसेच इतर देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट सुरू असूनही राज्यात बस, रेल्वे, हॉटेल्स, मॉल्स, सार्वजनिक ठिकाणांवर फार निर्बंध नाहीत. याची जाणीव ठेवत नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

राज्यात गुढीपाडव्याला अनेक भागात मोठ्या शोभायात्रा निघतात. यावेळी मास्कमुक्तीचा निर्णय व्हावा, अशी मागणी केली जातेय. याविषयी बोलताना राजेश टोपे म्हणाले, ‘ दुसऱ्या देशांमध्ये चौथ्या लाटेचे परिणाम जाणवत आहेत. त्यामुळे अगदीच मास्क घालयचा नाही. अशी हिंमत आपण करू शकणार नाही. नागरिकांसाठी ते हितकारक आहे. आपल्याला संसर्ग झाला असेल तर इतरांना संसर्ग होण्यापासून रोखलं जाऊ शकतं. त्यामुळे सध्यातरी मास्क मुक्तीचा विचार नाही. चौथ्या लाटेबाबत डेस्टा प्लस, ओमायक्रॉन तसं डेल्टाक्रॉनबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. तो दूर करण्यात आला आहे. टास्क फोर्स व विविध संस्था या क्षेत्रात सातत्याने काम करत असतात. जगात, देशात काय चाललंय, प्रतिबंधक योजनांबाबत मार्गदर्शन करत असतं. निर्बंधांसंदर्भात मागण्या येतात. आम्ही टास्क फोर्सपर्यंत या मागण्या पोहोचवतो आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेत असतो. गुढी पाडव्याबद्दलचा निर्णयही त्यांच्याशी चर्चा करून घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *