केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अधीश या बंगल्यावर कारवाई होणार ? तर आदित्य ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जुहू परिसरातील अधीश या बंगल्यावर कारवाई होईल का ? मुंबई महानगर पालिकेकडून आलेल्या नोटिसांनंतर मुंबईतल्या जुहू इथल्या अधीश बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचं पथक रवाना झालं आहे. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज राणेंच्या बालेकिल्ल्यात असतील. आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहे. अधिवेशनावेळी म्याव म्याव प्रकरण आणि त्यानंतर संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंना झालेल्या अटकेनंतर आदित्य ठाकरे यांचा सिंधुदुर्ग दौरा आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे काय बोलणार याकडं लक्ष लागलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या जुहू इथल्या अधीश बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचं पथक जाणार आहे. नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेनं याआधीच नोटीस बजावली आहे. तसेच आजच्या पाहणीनंतर मुंबई महापालिकेच्या पथकाला नारायण राणेंच्या बंगल्यात अनियमित बांधकाम असेल तर अधीश बंगल्यावर कारवाई होणार का ?
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल रात्री अकरा वाजता कोल्हापुरात रंकाळा तलावाची पाहणी केली. आज अंबाबाईचे दर्शन घेऊन आढावा बैठकीला सुरुवात करणार असल्याची शक्यता आहे.