यशश्री शिंदेची हत्या का करण्यात आली? पोलिसांनी केला मोठा खुलासा

नवी मुंबई मर्डर न्यूज : उरण हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला गुन्हे शाखेने कर्नाटकातून अटक केली आहे. नवी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील महत्त्वाची माहिती दिली. ही घटना पाच दिवसांपूर्वी घडल्याचे साकोरे यांनी सांगितले. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी त्याचे मित्र, कुटुंब आणि स्थानिक लोकांची मदत घेतली. त्यामुळे तीन-चार संशयितांची ओळख पटली असून, पुढील तपास सुरू केला आहे.

भारतीय हवाई दलात भारती होण्याची आणखी एक संधी, “या” तारखेपर्यंत भरू शकता फॉर्म

अश्या प्रकारे आरोपीला अटक :
पोलिसांच्या पथकांनी नवी मुंबई आणि कर्नाटकमध्ये आरोपींचा शोध घेतला. नवी मुंबईतून मिळालेल्या माहितीच्या आधारे कर्नाटकात दोन पोलिस पथके तैनात करण्यात आली होती. या माहितीच्या आधारे आज सकाळी मुख्य आरोपी दाऊद शेख याला अटक करण्यात आली.

अतिरिक्त पोलिस आयुक्त साकोरे यांनी सांगितले की, यशश्रीच्या वडिलांनी गुरुवार, 25 जुलै रोजी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी यशश्रीचा मृतदेह सापडला. तपासासाठी आठ पथके तयार करण्यात आली असून, दोन पथके कर्नाटकात पाठवण्यात आली आहेत. यशश्रीच्या मृत्यूचे कारण चाकू हल्ला असल्याचे सांगण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी यशश्रीच्या चेहऱ्याला प्राण्यांकडून इजा झाली असावी, असे म्हटले आहे. यशश्री आणि दाऊद हे दोघेही उरणमध्ये राहत असून त्यांची जुनी ओळख होती. ते एकाच शाळेत शिकले की नाही, याची माहिती घेतली जात आहे. दोघांमध्ये झालेल्या वादातून ही घटना घडली असावी.

हत्येनंतर दाऊद शेखचा शोध घेणे अवघड झाले, मात्र तो कर्नाटकात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याचे नातेवाईक आणि मित्राच्या मदतीने दाऊदचे लोकेशन ट्रेस केले आणि अल्लार गावातून त्याला अटक केली. याप्रकरणी अन्य संशयितांचाही तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊद शेखने यशश्री शिंदे यांच्या हत्येची कबुली दिली आहे. मात्र, अद्याप तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.  यशश्रीचा मृतदेह उरणमधील झुडपात सापडला असून तिच्या अंगावर चाकूच्या जखमा होत्या. तिच्या पोटावर आणि प्रायव्हेट पार्टवर चाकूच्या अनेक जखमा होत्या.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *