राजकारण

महायुती ला सरकार स्थापन करण्यासाठी का लागतोय वेळ? भाजपची प्रतिक्रिया जाणून घ्या

Share Now

चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया: विरोधकांचा पराभव स्वीकारून आत्मचिंतन करा, सरकारच्या स्थापनेसाठी वेळ लागणार
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर टीका करत म्हटले की, “नांदेडमध्ये ईव्हीएम चांगलं होतं, परंतु आम्ही 1500 मतांनी हरलो. विरोधकांनी पराभव स्वीकारला पाहिजे आणि आत्मचिंतन करायला हवं.” त्यांनी लोकसभेच्या पराभवावरून शिकून पुढे जाण्याचे उदाहरण दिले, तसेच मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ करण्यासाठी बूथवार काम केल्याची माहिती दिली.

विरोधकांच्या ईव्हीएमवरील आक्षेपानंतर “या” मतदार संघात पुन्हा फेरमतमोजणी होणार?

मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य चेहरा आणि मंत्रिमंडळाच्या सदस्यत्वावर त्यांनी सांगितले की, “आघाडीच्या बैठकीला काही काळ लागेल, मंत्रीपद आणि खाती निश्चित करण्यासाठी तयारी करावी लागेल. सरकार स्थापन होण्यासाठी लवकरच प्रयत्न सुरू होतील.” सरकार नोव्हेंबरमध्ये बनेल की डिसेंबरमध्ये, या प्रश्नावर बावनकुळे यांनी स्पष्ट उत्तर दिलं की, “याला काही पॅरामीटर नाही. सर्व पक्षांच्या सहमतीनंतरच सरकार बनवले जाईल.”

एकनाथ शिंदे यांच्या नाराजगीबद्दल त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “गृहमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद आणि केंद्रातील मंत्रीपद नाकारल्याबद्दल मला माहिती नाही.” संपूर्ण प्रक्रियेत भाजपने सर्व घटक पक्षांना न्याय देणारे सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे, आणि लवकरच सरकार स्थापन होईल, अशी आशा बावनकुळे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *