मुख्यमंत्रीपदाची रेस: देवेंद्र फडणवीस प्रबळ दावेदार का आहेत? जाणून घ्या राजकीय कारणं
मुख्यमंत्रीपदाची रेस: देवेंद्र फडणवीस प्रबळ दावेदार का आहेत? जाणून घ्या
महायुतीच्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांचे शर्यतीत आघाडीवर असण्याचे संकेत
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे, ज्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस हे प्रबळ दावेदार म्हणून समोर येत आहेत. २०१९ च्या राज्य निवडणुकीत जरी भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, मात्र या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या विक्रमी विजयामुळे फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदाचे चान्सेस अधिक प्रबल होत आहेत.
विवाह पंचमीच्या दिवशी हे उपाय करा, सर्व वाईट गोष्टी होतील दूर!
मुख्यमंत्रीपदाबाबत अनेक चर्चा मुंबईपासून दिल्लीपर्यंत सुरू आहेत. महायुतीच्या या अभूतपूर्व यशानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी भावना व्यक्त होत आहे. तसेच, नागपुरात फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचे पोस्टर्स देखील दिसून येत आहेत, आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या विरोधकांकडूनही त्यांना पाठिंबा दिला जात आहे.
“मेहकर दंगल: 23 जणांना अटक, संचारबंदी लागू; काय आहे या हिंसक घटनेचं कारण?
भाजपच्या केंद्रिय नेतृत्वाची भूमिका याबाबत अधिक स्पष्ट होईल, मात्र फडणवीस यांचा नेतृत्वाखाली महाराष्ट्राने घेतलेल्या विजयामुळे राज्यातील राजकीय समीकरणांत मोठे बदल घडू शकतात. २०१४ मध्ये मोदी लाटेवर भाजपने 122 जागा जिंकल्या होत्या, २०१९ मध्ये तो आकडा 105 पर्यंत गेला होता, मात्र या निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकून आपला सर्वात मोठा विजय संपादन केला आहे.
महायुतीची पत्रकार परिषद | मुंबई |
या विजयामुळे भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीने राज्यात स्थिर सरकार स्थापनेसाठी मार्ग प्रशस्त केला आहे. जर केंद्रीय नेतृत्वाने दुसऱ्या कोणालाही मुख्यमंत्री केले, तर २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या निर्णयामुळे त्यांना जी चूक झाली होती, तीच चूक भाजपने पुन्हा केली, असे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे.