महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया”
महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया”: ‘महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं, सर्व समाजातील घटकांनी मतदान केलं’
राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या सुरुवातीला महायुतीने 221 पेक्षा जास्त ठिकाणी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. भाजप 131 जागांवर आघाडीवर आहे, तर शिंदे गट 55 आणि अजित पवार गट 39 जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडी मात्र फक्त 51 जागांवर आघाडीवर आहे. राज्यात मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा रंगत असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली.
छ. संभाजीनगर पश्चिम मध्ये काटेची टक्कर, संजय शिरसाट एवढ्या मतांनी आघाडीवर
एकनाथ शिंदे म्हणाले, “महत्वाच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळेल, हे मी आधीच सांगितले होते. मतदारांनी दिलेल्या यशामुळे महायुतीला अभूतपूर्व विजय मिळाला आहे. या यशाचे श्रेय शेतकऱ्यांसोबतच समाजातील प्रत्येक घटकांना आहे. आम्ही अडीच वर्षात जो विकास साधला, त्याची पोचपावती या निवडणुकीत मिळाली आहे.”
शिंदे, भाजपा, अजित पवारांचा नोट जिहाद, ठाकरेंचा घणाघात
यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींचे, शेतकऱ्यांचे आणि भावांचे आभार व्यक्त केले आणि या यशासाठी जनतेचे आभार मानले. शिंदे गटाला मिळालेल्या या यशाबद्दल अनेक तासांपासून चर्चा सुरू आहे.