राजकारण

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण? ५ डिसेंबरला होणार मोठा निर्णय!

Share Now

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण? ५ डिसेंबरला होणार मोठा निर्णय!
महायुतीतील वाद संपवून फडणवीस मुख्यमंत्री होणार, शपथविधीची तयारी सुरू
विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या विजयाच्या अपेक्षेने राज्यात सरकार स्थापनेसाठी चर्चा सुरू होत्या. मात्र, मंत्रीपदाच्या वाटपावरून आलेल्या वादामुळे सरकार स्थापन करण्यास विलंब झाला आहे. अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबत संभ्रम होता, परंतु आता याबाबत मोठे स्पष्टिकरण समोर आले आहे.

उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शिवरात्री, जाणून घ्या कोणत्या शुभ मुहूर्तावर भोलेनाथाची करावी पूजा.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतील एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना राज्याचा नवा मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले गेले. यानंतर भाजप आणि महायुतीतील इतर पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदावर असलेल्या चर्चेचा शेवट झाला आणि फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रिपदावर दावा कायम, उदय सामंत यांचे स्पष्टिकरण

फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदी निवडीची अधिकृत घोषणा भाजपच्या विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीच्या वेळी केली जाणार आहे. त्यानंतर, शपथविधीची तयारी सुरू झाली असून, ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला शपथविधी दादरच्या शिवाजीपार्कवर होईल, अशी माहिती होती, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाची तयारी पाहता आझाद मैदानावर शपथविधी होण्याचे ठरवले आहे.

अशाप्रकारे, मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयानंतर मंत्रीपदाच्या वाटपावरून महायुतीतील तणाव कमी होईल, अशी आशा आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवा सरकार लवकरच राज्यात कार्यरत होईल, असे राजकीय वर्तमनात चर्चेत आहे.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *