देश

मजुरी करायला गेले आणि लखपती झाले, मिळाले सोन्याचे घबाड

Share Now

ढिगारा हटवताना मजुरांना सोन्याची नाणी  सापडली. एक दोन नव्हे तर तब्बल 86 सोन्याची नाणी. इतकी सोन्याची नाणी सापडल्यानंतर त्याचं काय करायचं, असा प्रश्नही त्यांना पडला होता. खरंतर ही नाणी सापडल्यानंतर त्यांनी ती आपआपसातच वाटून घेतली. पण नशिबाने एवढी लॉटरी लागूनही ती फार काळ मजुरांना टिकवता येऊ शकली नाही. त्याचं झालं असं, की आपआपसात नाणी वाटून देणं मजुरांना चांगलंच अंगाशी आलं. सगळ्या मजुरांना अटक (Labour Arrest) करण्यात आली. ही अटक होण्यामागे एका मजुराची चूक सगळ्यांना भोवली. आपसात वाटून घेतलेली नाणी एका मजुराने विकायचं ठरवलं. एक नाणं विकलं गेलं. त्यानंतर याची माहिती पोलिसांना मिळाली. अखेर हे सगळंच प्रकरण उघडकीस आलं. ही नाणी साधीसुधी नसून पुरातत्व नाणी असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. ही घटना आहे, मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यामधील

परीक्षा संदर्भांत मोठी बातमी, ‘PARAKH’ नावाची नवी परीक्षा येणार, कशी असेल परीक्षा वाचा…

नेमकं काय घडलं?
मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यामध्ये एक जुनं घर पाडलं गेलं. घर पाडल्यानंतर या घराचा ढिगारा हटवण्याचं काम काही मजुरांना देण्यात आलं होतं. मजूर आपलं काम इमानेइतबारे करत होते. पण काम करताना अचानक त्यांना नाण्यासारखं काहीतरी आढळलं. ढिगाऱ्यात नाणी कुठून आली असा प्रश्न मजुरांना पडलं.

मजुरांनी गुपचूर ढिगारा व्यवस्थित बाजूला गेला. ढिगारा हटवल्यानंतर मजुरांना सोन्याची 86 नाणी तिथं आढळून आलं. सगळ्याच मजुरांचे डोळे चमकले. आपल्याला जणू लॉटरीच लागल्याचा भास मजुरांना झाला. आता एवढी नाणी मिळाली आहेत, तर मग भांडण होऊ नये म्हणून मजुरांनी एक पर्याय शोधला. आपआपसात नाणी वाटून घेतली. घर पाडल्यानंतर ढिगारा हटवण्याचं काम ज्याने दिलं होतं, त्याला याबाबत मजुरांनी काहीच सांगितलं नाही. ढिगारा हटवण्याचं काम संपल्यावर मजून निघून गेले.

3 गोष्टी…ज्यासाठी प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीने TATA ला धन्यवाद म्हटले पाहिजे

पाहा व्हिडीओ :

https://twitter.com/srdmk01/status/1564299277840822273?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1564299277840822273%7Ctwgr%5Ec40285f498b20865b77475dd8380dd5c1174af20%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fcrime%2Fmadhya-pradesh-86-gold-coins-seized-by-8-labours-in-dhar-by-police-au136-794236.html

 

इथेच सगळा घोळ झाला

ही घटना 19 आणि 21 ऑगस्ट रोजी घडली होती. 2600 चौरस फूट जागेत पाडकाम करताना मजुरांना हा खचिना हाती लागला होता. एका धातूच्या भांड्यात मजुरांना एक किलो वजनाची 86 सोन्याची नाणी आढळलेली होती. या आठ मजुरांपैकी एका मजुराने दारुच्या नशेत आपल्याकडे असलेलं एक नाणं 56 हजाराला विकल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यानं आलेल्या पैशातून एक सेकंड हॅन्ड फोन घेतला आणि आपली दैनंदिन आर्थिक व्यवहार भागवू लागला. यातून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *