चक्क..! शनिवारी शौचालयाचा वाढदिवस ..! काय आहे हा उपक्रम ?
जागतिक शौचालय दिनाच्या निमित्ताने येत्या शनिवारी, १९ नोव्हेंबर रोजी जि.प. पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्हाभरात ‘शौचालयाचा वाढदिवस’ साजरा करण्याचा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
“माझे शौचालय ही भावना लोकामध्ये वृद्धिंगत व्हावी, यासाठी जि.प. प्रशासनाने जागतिक शौचालय दिनी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे .
या दिवशी प्रत्येक कुटुंबाने आपल्या शौचालयासमोर रांगोळी काढावी, शौचालयाच्या दरवाजाला तोरण बांधून त्यापुढे सेल्फी घ्यावी व ती जिल्हा कक्षाला पाठवावी, असे आवाहन सीईओ विकास मीणा, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांनी केले.
सेल्फी पाठविण्यासाठी लिंक
सेल्फी पाठविण्यासाठी जिल्हा कक्षाने एक लिंक तयार केली. आहे. या लिंकवर क्लिक करून ग्रामपंचायतीचे नाव, गावाचे नाव, सेल्फी घेणाऱ्या व्यक्तीचे नाव तसेच शौचालय वापरामुळे झालेला फायदा ही माहिती अपलोड करायची आहे.
रिक्षाचालकाने विचारले अश्लील प्रश्न, मुलीने धावत्या रिक्षातून घेतली उडी
ग्रा.पं. मधील सार्वजनिक शौचालयाची साफसफाई करून त्यावर विद्युत रोषणाई करावी, लिकवर त्यासंबंधीचा फोटो अपलोड करावा. ग्रा.पं. मध्ये लोकसहभागातून सार्वजनिक ठिकाणी, शाळा, अंगणवाडीत साफसफाई, प्लास्टिक व्यवस्थापन, सिंगल यूज प्लास्टिक जमा करणे, पाणी व स्वच्छतेविषयी जनजागृती करणे, हेही या उपक्रमात समाविष्ठ करण्यात आले आहे.