नवले पुलावरील अपघाताची संख्या शून्यावर येण्यासाठी प्रयत्न करु : सुप्रिया सुळे
नवले पुलावरील अपघाताची संख्या शून्यावर येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. त्यांनी पुण्यातील नवले पुलावरील अपघातस्थळाची सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली त्यावेळी त्या बोलत होत्या.
Pune Navale bridge Accident : नवले पुलावरील (Navale Bridge Accident) अपघाताची संख्या शून्यावर येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. त्यांनी पुण्यातील नवले पुलावरील अपघातस्थळाची सुप्रिया सुळे (Pune) यांनी पाहणी केली त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी रस्त्याची रचना, महापालिकेकडून फूटपाथ, सर्व्हिस रोड योग्य पद्धतीने बांधण्यात यावे, अशी मागणी त्यांनी महापालिकेकडे केली आहे. या मार्गावर अपघात का होतात? याची योग्य माहिती घेऊन रोड एक्स्पर्टकडून त्रुटी दूर करायला हव्यात. अपघात सातत्याने होत असेल तर त्यावर उपाययोजना करुन अपघाताची संख्या शून्यावर कशी येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असंही त्या म्हणाल्या.
आज प्रदोष व्रत, जाणून घ्या पूजा करण्याची पद्धत आणि शुभ मुहूर्त
हिवाळ्यात मुनका औषध म्हणून का काम करते, जाणून घ्या कोणती आहे ती खाण्याची योग्य पद्धत
2021 मध्ये लोकसभेत नितिन गडकरी यांच्याकडे या पुलाबाबत चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी या मार्गाच्या काही भागावर उपाययोजना केली. मात्र काही महत्त्वाच्या बाबी अजूनही झालेल्या नाहीत. त्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी झालं नाही. पुणे महापालिकेने या मार्गावर सर्व्हिस रोड बांधण्याची गरज आहे. ते नसल्याने अनेक अपघात होतात. त्यासोबतच या पुलावर तीव्र उतार आहे. आतापर्यंतच्या अपघाताला हा उतार कारणीभूत ठरला आहे. यावर पालिकेने उपाययोजना करणं गरजेचं आहे. शिवाय ज्या जागी सातत्याने अपघात होत आहे. या ठिकाणांचं निरीक्षण करुन ते निश्चित करायला हवेत. हा उतार कसा कमी करता येईल, यावर रोड एक्स्पर्टकडून माहिती घेऊन उपाययोजना करायला हव्यात, असं त्यांनी म्हटलं आहे.
Health Tips : जिममध्ये का येतो हृदयविकाराचा झटका? व्यायाम करताना ‘या’ चुका टाळा
‘सेफ्टी कायदा भक्कम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील’
या पुलाच्या विषयासंदर्भात पोलीस आयुक्त, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि महापालिकेचे आयुक्त देखील या अपघातस्थळी भेट देणार आहेत. हे सगळे मिळून या परिसराची पाहणी करणार आहेत. त्यानंतर त्रुटी नोंदवून नितिन गडकरींशी चर्चा करणार आहोत. महामार्ग झाले आहेत ते नागरिकांसाठीच आहेत. मात्र यामुळे वाहनांचा वेगही वाढला आहे. त्यामुळे रोड सेफ्टी कायदा भक्कम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.
नवले पुलावरील अपघाताचं नेमकं कारण समोर आलं,ट्रकचा ब्रेक फेल झालाच नव्हता !
पोलीस, फायर ब्रिगेड, महापालिका आणि डॉक्टर्सचे आभार
पुण्यातील नवले ब्रीज परिसरात झालेला अपघात दुर्दैवी आहे. या अपघाताबाबत मी सातत्याने प्रशासन, पोलीस व मदत यंत्रणांच्या संपर्कात आहे. या अपघातात जखमी झालेल्या सर्वांना योग्य उपचार मिळतील याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे. याशिवाय आम्ही सर्वजण देखील उपलब्ध आहोतच. ही घटना घडल्यानंतर पोलीस, फायर ब्रिगेड, महापालिका आणि डॉक्टर्स यांनी तातडीने धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत पोहोचवली, त्याचे आभार मानले आहेत. या घटनेतील जखमी व्यक्ती लवकर बऱ्या होऊन घरी सुखरुप परत याव्यात, अशी प्रार्थना देखील त्यांनी केली आहे.