“हम डरेंगे नहीं, हम झुकेंगे नहीं, आपको झुकायेंगे” संजय राऊत यांची ठाकरे शैलीत पत्रकार परिषद
संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपचे किरीट सोमय्या आणि ईडी करून होणाऱ्या चौकशी बाबत संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले. आजच्या पत्रकार पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते आमदार आणि खासदार देखील उपस्थित होते
बाळासाहेबांनी आम्हाला एक मंत्र दिला आहे तू काही पाप केलं नसंल तर कुणाच्या बापाला घाबरू नको. आजची
महाराष्ट्र गांडूची औलाद नाही , मराठी माणूस घाबरणार नाही. गेल्या काही दिवसापासून आपण पाहताय शिवसेना असेल ठाकरे परिवार असेल अनिल परब, भावना गवळी , अश्या सगळ्यांवर जे हल्ले करत आहे.
किरीट सोमय्या यांच्यावर पीएमसी बँक घोटाळ्यात हात असल्याचे सांगितले, निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील आदित्य ठाकरे व्याच्याकडे करण्यात आली. पीएमसी बँक घोटाळ्यात फसवणूक केली आहे. तसेच राकेश वधवाण याच्याशी आर्थिक संबध झाले आहेत. निकोन इन्फ्रा कंपनी यात किरीट सोमया पार्टनर आहेत. दोन जमिनी घेतल्या आहेत, त्यात निल किरीट सोमया अंक निकोन फ्रंट १ आणि फ्रंट २ सुरू झालं आहे.
ईडी कडून होणाऱ्या कारवाईवर देखील संजय राऊत यांनी ईडीचा ठाकरे शैलीत समाचार घेतला आहे. सूडबुद्धीने कारवाई करत असून आमची एक गुंठा जमीन असेल तर त्याची चौकशी होत असते.
महाराष्ट्रात १७० च बहुमत असताना हे तारखा देत असतात, साधारण २० दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षचे प्रमुख मला भेटलं कोणत्याही परिस्थितीत आम्हाला सरकार घालवायचा आहे. तुम्ही मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणा ताईत करीतील अश्या धमक्या येत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
मुंबईतील ७० बिल्डराकडून वसुली चालू आहे, मी सगळ्यात पहिले नरेंद्र मोदीना पत्र लिहणार आहे, जितेंद्र नवलानी , फरीद शमी यांनी ३०० कोटी जमा केले आहेत.
भाजपला महाराष्ट्र, बंगाल आणि झारखंड या राज्यत सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महाआयटीत 25 हजार कोटींचा सर्वात मोठा घोटाळा झाला आहे.
त्या साडेतीन नेत्यांपैकी आज एका नेत्याला समाचार संजय राऊत यांनी घेतला असून उर्वरित नेत्यांची नावे घेतली नाही. यापुढे कुणावर टीका करणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून आहे.