महाराष्ट्र

‘फेंगल’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा!

Share Now

‘फेंगल’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा!

फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कडाक्याचा परिणाम, शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर तुफान गडबड आहे आणि आता याचा फटका महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे, तसेच राज्यात 6 डिसेंबरपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांसाठी चिंता वाढलेली आहे, कारण काही ठिकाणी थंडीच्या काळात पाऊस पडणार असल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.

“पालघर: विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार का बनला जीवघेण्या संकटाचे कारण?”

डख यांनी शेतकऱ्यांना आपल्या काढणी झालेल्या शेतमालाला सुरक्षितपणे झाकून ठेवण्याचा सल्ला दिला आहे, विशेषतः कांदा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांना. फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशीव इत्यादी भागांत 3 डिसेंबर रोजी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल, असं अनुमान आहे.

हिवाळ्यात आरोग्यसाठी सर्वोत्तम आहार पण मागणी वाढल्यामुळे बाजरीच्या किंमतीत वाढ !

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हिंगोली, नांदेड, परभणी, वाशिम, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांतही अवकाळी पाऊस होऊ शकतो.

यावेळी हवामान विभागाने दिलेला अलर्ट शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरला आहे, कारण अवकाळी पाऊस आणि वादळामुळे पीकांना गंभीर परिणाम होऊ शकतात. पण 8 डिसेंबरपासून राज्यातील हवामान स्वच्छ होईल आणि पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता आहे, असं डख यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *