विवाहासाठी आता ‘या वयात’:

मुलींच्या लग्नाच्या अधिकृत वयाच्या बाबतीत केंद्राने मोठी घोषणा केली आहे. आता मुलींच्या लग्नाचं लीगल वय १८ वरून २१ करण्यात आलं. मुलांच्या बरोबरीने मुलींचंही वय करण्यात आलं . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पहिल्यांदा याचा उल्लेख केला होता.सरकार बालविवाह प्रतिबंध कायदा, विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायद्यात सुधारणा करून त्याला एक स्वरूप देणार आहे.

नीती आयोगात जया जेटली यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्सने याची शिफारस केली होती. व्ही. के. पॉल हे देखील या टास्क फोर्सचे सदस्य होते. या व्यतिरिक्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव, महिला आणि बाल विकास, उच्च शिक्षण, शालेय शिक्षण आणि साक्षरता अभियान आणि न्याय आणि कायदा मंत्रालयाचे विधेयक विभाग टास्क फोर्सचे सदस्य होते.पहिल्या मुलाला जन्म देताना महिलेचे वय हे २१ वर्षे पाहिजे, लवकर विवाहाने सामाजिक-आर्थिक-आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो तर विवाह काहीसा उशिरा केल्यास कुटुंब, महिला,मुलं आणि समाज यांच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, असे टास्क फोर्स नी म्हंटल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *