क्राईम बिट

विनोद तावडेंचा ‘माफ करा’चा आग्रह, हितेंद्र ठाकूरांचा मोठा खुलासा- पैसे वाटपाचं प्रकरण

नालासोपाऱ्यात तुफान राडा: भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून वाद
नालासोपारा: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नालासोपाऱ्यात मोठा वाद उफाळला आहे. भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे आणि भाजपचे नालासोपाऱ्याचे उमेदवार राजन नाईक यांना बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते घेरत असताना तुफान राडा झाला. पैसे वाटपाचे आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना जाब विचारला, वसई-विरार क्षेत्रातील मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये हा घटनाक्रम घडला.

त्यांच्या नादी त्यांचे…” चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांवर जोरदार टीका

वसई-विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “पाच कोटींचं वाटप सुरू आहे. मला डायऱ्या मिळाल्या आहेत आणि लॅपटॉप आहे. कुठे, काय वाटप होतं आहे, याची संपूर्ण माहिती मला आहे.” तसेच, त्यांनी तावडे यांच्यावर टीका करत सांगितले की, “विनोद तावडे यांना 48 तास आधी मतदारसंघ सोडायचं असतं, हे त्यांना माहीत नाही, आणि ते राज्याचे शिक्षण मंत्री होते.”

राहुल गांधींनी मोदी-अदानी यांच्या नात्यावर केले गंभीर आरोप

आमदार ठाकूर यांनी यावेळी तावडे यांचे फोन कॉल्स दाखवले आणि दावा केला की, “तावडे यांनी मला 25 फोन केले. ‘माझं चुकलं, माफ करा’ असं ते म्हणाले,” अशी माहिती दिली. आमदार ठाकूर यांनी यापुढे जोरदार आरोप करत सांगितले, “भाजपचा राष्ट्रीय नेता पैसे वाटायला आलाय. पोलिसांनी कारवाई करावी. त्यानंतरच आम्ही तिथून बाहेर पडू.” तसेच, त्यांचे फोन बुक पाहून तावडे आणि राजन नाईक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *