विधान परिषदेवर डॉ प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड
औरंगाबाद – डॉ. प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाली आहे, भाजपचे उमेदवार संजय केनेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांच्या निवडी झाल्याचे घोषित केले.
काँग्रेस पक्षाचे गटनेते विधान परिषदचे आमदार शरद रणपिसे याच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होणार होती. परंतु राजकीय परंपरा जोपासत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचे प्रयत्न होते, या विषय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. भाजपाने विनंती मान्य केल्याने सातव यांची निवड बिनविरोध झाली. सातव कुटुंबियांचे संबंध काँग्रेस बरोबरच गांधी घराण्यासोबत चांगले आहेत.
डॉ. प्रज्ञा सातव या राजीव सातव यांच्या पत्नी आहेत, खा.राजीव सातव काँग्रेसमध्ये राज्यसभा खासदार आणि राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य होते, संघटन कौश्यल्य चांगले होते.