हिंगणघाट जळीत हत्याकांड प्रकरणी विक्की नगराळेला जन्मठेपची शिक्षा
गेल्या दोन वर्षापूर्वी घडलेली हिंगणघाट जळीत हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागला आहे.एकतर्फी प्रेम करणाऱ्या विकेश (विक्की) नगराळे याने ३ फेब्रुवारी २०२० रोजी शिक्षिकेला भररस्त्यात पेटवले होते. यात त्या शिक्षिकेचा उपचारादरम्यान १० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला.
या गुन्ह्यात आरोपी विक्की नागराळे फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत होती. ४२६ पानाचे आरोप पत्र, ६४ सुनावण्या आणि २९ साक्षीदारांची साक्षीदारांची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण होताना आज निकाल लागणार होता.
प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सरकारनं विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकमांची नियुक्ती केली होती.
या प्रकरणात महत्त्वाची बाब अशी की, यात २९ साक्षीदार होते, एकही साक्षीदार फितूर झालेला नाही. त्यामुळे आरोपीचा दोष सिद्ध करण्याइतपत भक्कम पुरावे असून ते सरकारी पक्षाने न्यायालयापुढे सादर केल्याचे दीपक वैद्य म्हणाले.
या प्रकरणी दोषी विक्की नगराळेला न्यायालयाने जन्म ठेपेची शिक्षा सुनावली आहे.
३ फेब्रुवारी रोजी काय घडलं..?
पीडित प्राध्यापिका आणि आरोपी हेमंत नगराळे हिंगणघाट गावातील आहे. पहाटे ७ वाजता नियमितपणे प्राध्यापिका महाविद्यालयात जात होती, आरोपी हेमंत नगराळे याचं एकतर्फी प्रेम याचा राग मनात घेऊन त्याने पीडितला पेट्रोल टाकून पेटवून दिले यात पीडिता गंभीररीत्या जखमी झाली आणि १० फेब्रुवारी रोजी पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला.