देश

एकाच सिरिंजने ३० विद्यार्थ्यांचे लसीकरण, एक व्यक्ती अटक

Share Now

मध्य प्रदेशातील सागरमध्ये एका आरोग्य कर्मचाऱ्याने ३० शाळकरी मुलांना एकाच सिरिंजने कोविड-१९ लस दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही लस देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच जिल्हा लसीकरण अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. तो व्यक्ती त्याच्या बचावात म्हणाला की यात ‘माझा काय दोष. मी फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करत होतो’.

लोकप्रिय मोबाइल गेम BGMI Google Play Store आणि Apple App Store वरून गायब, PUBG प्रमाणे भारतात बंदी घालणार का?

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील जैन उच्च माध्यमिक विद्यालयात एका भव्य लसीकरण मोहिमेदरम्यान बुधवारी, 27 जुलै रोजी ही घटना घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. नर्सिंग कॉलेजचा विद्यार्थी जितेंद्र अहिरवार याच्याकडे मुलांना लसीकरण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अधिकाऱ्याने सांगितले की, ही 15 वर्षांवरील 9वी ते 12वी इयत्तेतील मुले होती ज्यांचे लसीकरण झाले.

गाय आणि म्हशी देखील होऊ शकतात सरोगेट मदर, जनावरांच्या मालकांना याचा होणार फायदा

काही मुलांच्या पालकांनी अहिरवार यांना त्याच सिरिंजचा वापर करून मुलांना लस देताना पाहिले आणि या गंभीर निष्काळजीपणाचा विरोध केला, असे अधिकाऱ्याने सांगितले. पालकांच्या विरोधानंतर सागरचे प्रभारी जिल्हा दंडाधिकारी क्षितिज सिंघल यांनी जिल्हा मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (CMHO) डॉ डी के गोस्वामी यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाठवले.

आरोग्य कर्मचारी म्हणाला…

ही लस देणाऱ्या जितेंद्रने दावा केला की, “वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकच सिरिंज पाठवली होती आणि तीच सर्व बालकांना लसीकरण करण्याचे आदेश विभागप्रमुखांनी दिले होते”. विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये जितेंद्रने आपले नाव माहित नसल्याचे सांगितले.

एका सिरिंजचा वापर एकाहून अधिक लोकांना इंजेक्शन देण्यासाठी केला जाऊ नये याची तुम्हाला जाणीव आहे का असे विचारले असता. यावर जितेंद्र म्हणाले, “मला हे माहित आहे… म्हणूनच मी त्याला (अधिकाऱ्याला) विचारले की मला फक्त एक सिरिंज वापरायची आहे का आणि ते ‘हो’ म्हणाले. त्यात आमचा काय दोष? मी तेच केले. करण्यास सांगितले होते.”

कायदेशीर कारवाई

पालकांनी विरोध केल्यानंतर अहिरवार तेथून पळून गेल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सीएमएचओने शाळेची पाहणी केली असता तो तेथे आढळून आला नाही. आरोपीने त्याचा मोबाईलही बंद केला. आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना गांभीर्याने घेत सागरचे विभागीय आयुक्त मुकेश शुक्ला यांनी गुरुवारी सीएमएचओच्या अहवालाच्या आधारे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ शोभाराम रोशन यांना निलंबित केले. विभागीय आयुक्तांनी निलंबनाचे आदेश जारी करून डॉ. रोशन यांच्या जागी अन्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

ही घटना उघडकीस आल्यानंतर लस देणाऱ्या अहिरवारला अटक करण्यात आली आहे. गोपाल गंज पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी अहिरवार यांच्याविरुद्ध आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. सागरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याची शिफारस केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *