उत्तर प्रदेशच्या तब्बल ४० टक्के कॉग्रेसच्या जागा लढवणार महिला, उमेदवारांची पहिली यादी जाहीर
नवी दिल्ली : लवकरच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकींना सुरुवात होणार आहे. अशात काॅंग्रेसची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत एकुण १२५ उमेदवारांचा समावेश आहे. काॅग्रेसच्या सरचिटणीस प्रिंयका गांधी यांनी ही यादी जाहीर केली आहे. यादीत एकूण ४० टक्के महिला उमेदवरांचा समावेश आहे.
प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्या म्हणाल्या, “उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आहोत. यामध्ये ५० महिला उमेदवारांचा समावेश आहे. संपूर्ण राज्यात संघर्ष करणारे आणि नव्या राजकारणाची सुरुवात करणारे उमेदवार असावे असा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही उत्तरप्रदेशाच्या राजकारणाला नवी दिशा देऊ शकू असा आमचा प्रयत्न आहे.” असे त्या म्हणाल्या
उत्तर प्रदेशच्या ४०३ जागांच्या विधानसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये १०, १४ , २०, २३ , २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि सात मार्चला मतदान होणार आहे. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. करोनामुळे निवडणुकीसाठी नवीन प्रोटोकॉल करण्यात आला आहे. कोविडमुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.