मराठी पाट्या लावण्यासाठी खासदार निधीचा उपयोग करा – खा जलील
औरंगाबाद : सध्या मराठी पाट्यांचा विषय राज्यात जोर धरत आहे. शिवसेना, मनसे असा श्रेय वादाची झुंज देखील यात दिसत आहे. अशात एमआयएमने यात उडी घेतली आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेने मराठी पाट्या लावण्यासाठी व्यापाऱ्यांना निधी द्यावा असा सल्ला दिला आहे. तसेच खासदार निधीतून शिवसेनेने याची तरतूद करावी असे जलील म्हणाले आहे.
या आधी जलील यांनी शिवसेनेवर मराठी पाट्यांच्या विषयावर टीका केली होती. ” पाट्या मराठीत केल्याने तरुणांना रोजगार मिळणार का ?” असा सवाल उपथित केला आहे. “असे का होते की जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता इत्यादींबद्दल बोलतात, लोक मूर्ख नाहीत की त्यांना या नौटंकी समजत नाहीत. मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का, हा एक मिलियन डॉलरचा प्रश्न आहे.” असे ते म्हणाले होते.
दरम्यान, शहरात मनसे ज्यांच्या दुकानाला मराठीतून पाट्या आहे. त्यांचा सम्मान करण्याची मोहिम हाती घेतली आहे. तसेच शिवसेनेने त्यांच्या जुन्या पद्धतीने मराठी पाट्या विषयावर भर दिली आहे. मराठी भाषेचे संगोपन करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे असे शिवसेनेचे म्हणणे आहे.