देश

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची महत्वाची घोषणा ; सर्वसामान्याना वाहन चालवणे सोपे होणार

Share Now

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनचालकांना एक महत्वाची घोषणा केली आहे. टेक्नोलॉजी आणि ग्रीन फ्यूलसह इलेक्ट्रिक ऑटोमोबाइलची किंमत कमी होणार आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षात पेट्रोलने चालणाऱ्या वाहनांची संख्या बरोबरीत होईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे

रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्रालयाकडून २०२२-२३ साठी अनुदानाच्या मागणीवर लोकसभेत उत्तर देताना गडकरी यांनी कॉस्ट इफेक्टिव भारतात बनवणाऱ्या फ्यूलचा वापर करण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असं त्यांनी म्हटलं आहे. फ्यूल लवकरच एक जुनी गोष्ट बनणार आहे. यामुळे प्रदूषण कमी होणार आहे. तसेच दिल्लीतील वातावरणाच्या स्थितीत सुधारणा होईल. गडकरी यांनी खासदारांच्या वाहनांसाठी हायड्रोजन टेक्नोलॉजीचा वापर करण्यात यावा, अशी विनंती सुद्धा केली आहे. त्यांनी म्हटले की, आपापल्या जिल्ह्यातील कालव्याच्या पाण्याने ग्रीन हायड्रोजन बनवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हायड्रोजन लवकरच एक स्वस्त फ्यूल ऑप्शन होईल.

जास्तीत जास्त २ वर्षात इलेक्ट्रिक स्कूटर, कार, ऑटो च्या किंमती पेट्रोल ने चालणाऱ्या स्कूटर, कार, रिक्षाच्या समान होईल. लिथियम आयन बॅटरीच्या किंमती कमी होत आहेत. आम्ही जिंक-आयन, अॅल्यूमिनिअम आयन, सोडियम-आयन बॅटरीच्या या केमिस्ट्रीला डेव्हलप करीत आहे. जर पेट्रोलवर तुम्ही १०० रुपये खर्च करीत असाल तर इलेक्ट्रिक वाहनावर फक्त १० रुपये खर्च करावे लागतील, असे गडकरी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *