केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि सिद्धू मुसावालाच्या परिवाराची झाली भेट, केली ‘हि’ मोठी मागणी
सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांनी आज चंदीगडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी दिवंगत गायकाचे वडील भावूक झाले. या बैठकीचे फोटो समोर आले आहेत. गेल्या आठवड्यात, रविवारी, 29 मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात, पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची अज्ञात हल्लेखोरांनी भरदिवसा गोळ्या घालून हत्या केली होती. तेव्हापासून पंजाबच्या राजकारणात वातावरण तापले आहे. सिद्धूला सततच्या धमक्यांमुळे त्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याने त्यांच्या हत्येमुळे पंजाबच्या भगवंत मान सरकारला विरोध होत आहे. सिद्धू मुसेवालाचे नातेवाईक सिद्धूच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत आहेत.
हेही वाचा : आनंदाची बातमी , सोयाबीनच्या दरात वाढ !
मुसेवाला यांना गोळी मारणारे संशयित आरोपी सोनिपतमधील रहिवासी आहेत. प्रियवत फौजी आणि अंकित सेरसा यांची नावं समोर येत आहेत. या दोन्ही आरोपींची एक सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहे. यामध्ये हे दोघे पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरताना दिसत आहेत. फतेहाबादमधील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्रियव्रत फौजी आणि अंकित सेरसा हे दोघेही शार्प शूटर सोनीपतचे रहिवासी असल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा :
हैद्राबादच्या ‘त्या’ नेत्याच्या मुलाला अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणी अटक |
सिद्धू मुसेवालाच्या हत्येसंदर्भात पोलिसांकडून जलद गतीनं तपास सुरु आहे. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, दिल्लीची नंबर प्लेट असलेल्या कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी दोघे संशयित आरोपी फतेहाबादच्या बिसला गावातील पेट्रोल पंपावर पोहोचले होते.