Economy

अर्थसंकल्प २०२५-२६, १० मोठ्या घोषणा!

Share Now

अर्थसंकल्प २०२५-२६: करदात्यांना मोठा दिलासा, महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी विशेष घोषणा

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा म्हणजे १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय. हा निर्णय अनपेक्षित असला, तरी तो मध्यमवर्गीय करदात्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. यासोबतच प्राप्तीकर, महिलांसाठी विशेष योजना, वैद्यकीय सुविधा आणि कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

प्राप्तिकरातील मोठे बदल

  • १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त
  • TDS मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत वाढवली
  • पुढील आठवड्यात नवीन प्राप्तीकर विधेयक सादर होणार

महिलांसाठी विशेष तरतुदी

  • SC-ST महिला उद्योजकांसाठी विशेष कर्ज योजना
  • नवीन उद्योजक महिलांसाठी २ कोटी रुपयांपर्यंत कर्जाची तरतूद
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत ५० हजारांवरून १ लाख रुपये

आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा

  • ३६ आवश्यक औषधांवर पूर्णपणे करमुक्त सवलत
  • वैद्यकीय उपकरणे आणि कर्करोगाच्या औषधांच्या किमती कमी होणार

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा

  • किसान क्रेडिट कार्ड (KCC) मर्यादा ३ लाखांवरून ५ लाख रुपये
  • पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेचा १०० जिल्ह्यांना लाभ
  • दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालनासाठी ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज

याशिवाय, अर्थमंत्र्यांनी निर्यात क्षेत्रासाठी नवीन योजना जाहीर केल्या असून, एमएसएमईंना परदेशात टॅरिफ सहाय्य दिले जाईल. विमा क्षेत्रातील एफडीआय मर्यादा वाढवण्याचाही विचार सुरू आहे.

या अर्थसंकल्पातून करदात्यांना दिलासा, महिलांसाठी प्रोत्साहन आणि शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत अशा तिन्ही स्तरांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात सादर होणाऱ्या नवीन कर विधेयकातून अधिक स्पष्टता मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *