राजकारण

उद्धव ठाकरे यांची सत्ताधाऱ्यांवर फटकेबाजी; ‘बॅग तपासून प्रसिद्धी मिळवली

Share Now

उद्धव ठाकरे यांची सत्ताधाऱ्यांवर चांगलीच फटकेबाजी; बॅग तपासणीवर टोला, अमित शाहवरही निशाणा
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपाची हवा जोर धरू लागली आहे. याच दरम्यान, निवडणूक अधिकारी वठणीवर आल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली, त्यावरून आता राजकीय वातावरण ताजं झालं आहे. उद्धव ठाकरे आज अहिल्यानगर दौऱ्यावर असताना श्रीगोंदामध्ये बोलताना याच मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार फटकेबाजी केली. “माझ्या प्रसिद्धीमुळे आता सत्ताधारी देखील म्हणतात, ‘माझी बॅग तपासा’,” अशी टीका त्यांनी केली.

हे 5 प्रश्न प्रत्येक नोकरीच्या मुलाखतीत विचारले जातात, योग्य उत्तरे देऊन नोकरी कशी सुरक्षित करावी घ्या जाणून

उद्धव ठाकरे यांनी यावरून सत्ताधाऱ्यांच्या प्रचार पद्धतीवरही हल्ला चढवला. “लोक सभा सुरू असताना लोक बिर्याणी खातात आणि निघून जातात,” असे ते म्हणाले. तसेच, आपले विरोधक शाळेतील शिक्षकांसारखे असून, “आपल्यात घुसलेले शकुणी मामा कोण आहेत हे ओळखले पाहिजे,” असा टोला त्यांनी लगावला. यावेळी, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सहकार खात्याचा मुद्दा देखील उपस्थित केला. “अमित शाह यांनी सहकार खातं काढलं आणि त्याचं नियंत्रण स्वतःकडे घेतलं. आता तेच साखर कारखाने मोडून पडणार,” अशी घोषणा त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी महिलांसाठी वाढीव सुविधा आणि सुरक्षा देण्याचीही शंकेची स्पष्ट केली. “आम्ही महिलांना 3 हजार रुपये देऊ, त्यांना स्वतंत्र पोलीस ठाणे देऊ,” अशी ग्वाही त्यांनी दिली. याचप्रमाणे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा संदर्भ देत, “जर महाराष्ट्र मोदी आणि शाहांच्या हातात गेला, तर आपणही शेतकऱ्यांसारखे आत्महत्या करु,” असा इशारा त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *