उद्धव ठाकरे देशातील टॉप पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉप पाच मुख्यमंत्र्याच्या यादीत स्थान मिळवले आहे. मागील काही दिवसापासून आजाराची असल्याकारणनारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्क फ्रॉम होम करत असले तरी त्यांची लोकप्रियता कायम आहे. देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉपच्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नावाचा समावेश झाला आहे. इंडिया टुडे माध्यम समुहातर्फे एक सर्वेक्षण करण्यात आलं असून या सर्वेक्षणात उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता कायम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
इंडिया टुडे माध्यम समुहातर्फे प्रत्येक राज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर ४३ टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळालेल्या नऊ मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. सर्वोत्तम कामगिरी करण्याऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ओदिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी स्थान मिळवलं आहे. पटनायक यांनी केलेली कामगिरी ७१. १ टक्के नागरिकांना समाधानकारक वाटली.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा क्रमांक आहे. ममता यांच्या कामगिरीवर ६९. ९ टक्के लोकांनी समाधन मानले. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चौथा क्रमांक लागला आहे. उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर ६१. ८ टक्के जनचा समाधानी आहे. तर, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. त्यांच्या कामावर ६१. ६ टक्के जनतेनं समाधान व्यक्त केलं आहे.
दरम्यान, सहाव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत.५७.९ टक्के जनता त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नऊ मुख्यमंत्र्यांच्या यादीत भाजपचे केवळ एक मुख्यमंत्री आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विस्व शर्मा सातव्या क्रमांकावर आहेत. आसाममधील ५६.६ टक्के जनतेनं त्यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं. यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल ५१. ४ टक्के, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (४४. ९ टक्के) यांचा क्रमांक आहे.