क्रीडामहाराष्ट्र

मित्राच्या प्रेयसीला नोकरीचे आमिष देत ढकलले वेश्याव्यवसायात

Share Now

नागपूर : मित्राच्या प्रेयसीवर दोघांनी बलात्कार करून तीला वेश्या व्यावसात बळजबरी ढकलायची धक्कादायक घटना समोर आली आहे, या प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभाग आणि गुन्हे शाखेने पाच आरोपींना अटक केली. सत्यजित ऊर्फ निखिल बांगड, विशाल उर्फ दत्तू दाभणे ऊर्फ खाटीक, आकाश ऊर्फ विक्की भोसले, सचिन इंगळे, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यातील एक आरोपी अमित लोखंडे हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी एकमेकांचे मित्र असून . त्यांनी दहावीत असलेल्या मुलीला व मित्राच्य प्रेयसीला देहव्यवसाय करून घेण्यासाठी नागपुरात आणल्याचे उघड झाले. यातील मुख्य आरोपी विशाल कुख्यात गुंड असून. त्याच्यावर गंभीर स्वरूपाच्या २८ गुन्ह्यांची नोंद आहे. सहआरोपी सचिन इंगळे याच्यावर देखील गंभीर स्वरीपाचे १० गुन्हे आहे. विशालचा एक मित्र जवळच्या गावात राहतो. त्याच्या मैत्रिणीची विशालसोबत ओळख झाली. ती खाजगी काम करायची. या माध्यमातून तिची एका दहावीत असणाऱ्या अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. दोघींनाही विशालने नागपुरात नोकरी आणि पैशाचे आमिष दाखविले. आमिषाला बळी पडताच दोघींनाही नागपुरात आल्या. काही दिवस त्यांना आपल्या घरीच विशालने ठेवले.

हे हि वाचा 

१८ वर्षीय तरुणीचा विनयभंग, आधी दिले सिगारेटचे चटके मग फाडले कपडे

सत्यजित आणि सचिन यांनी मुलींना हुडकेश्वरातील लॉजवर नेऊन दोघांनी एकीवर बलात्कार केला तर दुसरीवरही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो मित्राच्या प्रेयसीसाठी ग्राहक शोधायला लागला. अशाप्रकारे दोन्ही मुलींना विशालने देहव्यापाराच्या दलदलीत लोटले. आरोपी आकाश आणि अमितने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला. त्यानंतर या प्रकरणाचा भंडाफोड झाला. अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली.

 

हे हि वाचा

महाराष्ट्रात कोरोनाचे संकट ?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *