बारावी केमिस्ट्रीचा पेपर फुटला..? ; क्लास चालकास अटक
राज्यामध्ये बारावी बोर्डाची परीक्षा सध्या सुरू आहेत. परीक्षेदरम्यान कोणताही पेपर फुटीचा प्रकार घडू नये. यासाठी बोर्डाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. परंतु, असे असताना देखील मुंबईमध्ये केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. शनिवारी बारावीच्या विद्यार्थ्यांचा केमिस्ट्री पेपर होता.
राज्यामध्ये इतर ठिकाणी हा पेपर सुरळीत पार पडला. परंतू मुंबईमधील विलेपार्ले परिसरातील साठे कॉलेजमध्ये पेपर फुटीची घटना उघडकीस आली आहे. यावर विधिमंडळ अधिवेशनात शिक्षण मंत्र्यांनी पेपर फुटल्याचा आरोप खोडून काढला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे केमिस्ट्रीचा जो पेपर लिक झाला आहे, तो चक्क एका व्हाट्सअप ग्रुपवर आला. या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जवळपास १७ विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे.
या पेपर फुटी प्रकरणी गुन्हा दाखल होताच विलेपार्ले पोलिसांनी मालाडच्या एका खाजगी शिकवणीच्या मालकाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. . या खाजगी शिकवणीच्या मालकाचे नाव मुकेश धनसिंग यादव आहे आणि यालाच पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी तीन विद्यार्थिनींची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली असून चौकशीनंतर त्या मुलींना सोडून देण्यात आले. विद्यार्थिनीचा मोबाईल सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस सध्या पुढील चाैकशी करत आहेत. या शिकवणी चालकाकडे केमिस्ट्रीचा पेपर कसा आला आणि हा पेपर मिळवण्यासाठी याने किती पैसे मोजले याची संपूर्ण चाैकशी सध्या सुरू आहे.
शनिवार, दिनांक १२ मार्च रोजी झालेल्या इ. बारावीच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. पेपर फुटला, असा चुकीचा प्रचार काही समाजमाध्यामातून सुरू आहे. त्यात तथ्य नाहीं. या प्रकरणी आज विधानपरिषदेत मी केलेलं निवेदन. pic.twitter.com/5TnlPxChek
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) March 14, 2022