महाराष्ट्र

राज्यात सौर ऊर्जा पार्क उभारणार ; राज्य सरकारची मोठी घोषणा

Share Now

मुंबई, दि.७ : आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी महानिर्मिती कंपनीस एनटीपीसी लि. सह संयुक्त कंपनी उभारण्यासाठी आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे.

राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेपर्यंतचे अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करण्याकरीता नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (किंवा त्यांचे सहाय्यक/ सहयोगी कंपनी) व महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी यांच्यात ५०:५० टक्के गुंतवणूक असणार आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर संयुक्त उद्यम कंपनी राज्यात २५०० मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करेल.

या समितीवर राज्य शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा धोरणाशी सुसंगत अशा बाबींचे पालन करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. सौर ऊर्जा पार्कमधील प्रकल्पधारकाकडून एक रकमी शुल्क व वार्षिक संचलन व देखभाल शुल्क इ. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनुज्ञेय करण्यात आले आहे.

राज्यात सध्या ९३०५ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प सुरू आहे, २१२३ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *