टिकटॉक स्टार ‘गोलीगत’ म्हणजेच सूरज चव्हाण झळकणार चित्रपटात

मुंबई : “का रं देवा” चित्रपटातून प्रेक्षकांच्या या चित्रपटाच्या माध्यमातून सूरज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकाच वेळी लाखो लोकांशी आपल्या बोबड्या भाषेत संवाद साधणारा आणि आपल्या हटके डायलॉगने सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळालेला सूरज लवकरच मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

“गोलीगत” आणि “बुक्कीत टेंगुळ” या त्याच्या प्रसिद्ध डायलॉगचा सुध्दा मोठा चाहता वर्ग आहे. सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनच्या प्रशांत शिंगटे निर्मित “का रं देवा” या आगामी मराठी चित्रपटातून तो आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रंजीत दशरथ जाधव यांचं आहे. अभिनेत्री मोनालिसा बागल, मयूर लाड, अभिनेते जयवंत वाडकर, अरुण नलावडे आणि नागेश भोसले यांच्या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *