माहीममध्ये तिरंगी लढत; सदा सरवणकरांच्या प्रचारात श्रीकांत शिंदे सहभागी, मुंबईतील 420 उमेदवार रिंगणात
सदा सरवणकर
राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत आणि यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. निवडणुकीचे बिगूल वाजल्यानंतर राज्यभर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. मुंबईतील हायव्होल्टेज माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत रंगणार आहे.
माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत
माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे महेश सावंत यांच्यात थेट लढत होणार आहे. या लढतीला महत्त्व असून राज ठाकरे यांच्यासाठी ती विशेष प्रतिष्ठेची मानली जात आहे. सध्या या तिघांकडून जोरदार प्रचार सुरु आहे.
काका-पुतण्याची ती जोडी ज्यात ‘बंड’ नव्हते, दोघेही झाले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
सदा सरवणकरांची प्रचारफेरी
काल सदा सरवणकर यांची प्रचारफेरी दादरमधील शिवसेना भवन कार्यालयासमोर आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. प्रचारफेरीत शिंदे आणि सरवणकरांवर फुलांची उधळण करण्यात आली.
श्रीकांत शिंदे काय म्हणाले
शिवसेना आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकर यांच्या प्रचारार्थ दादर, प्रभादेवी आणि माहीम येथे आयोजित प्रचार रॅलीत श्रीकांत शिंदे सहभागी झाले. रॅलीत होणारा शिवसेनेचा जयघोष आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यावर आधारित श्रीकांत शिंदे यांनी विजयाची शाश्वती व्यक्त केली. त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, २० नोव्हेंबर रोजी धनुष्यबाण चिन्हावर बटन दाबून भरघोस मतदान करा.
मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
महायुती आणि महाविकासआघाडीचा मुकाबला
मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात 420 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. महाविकासआघाडीने मुंबईतील 36 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 22, काँग्रेसचे 11, शरद पवार गटाचे 2 आणि समाजवादी पार्टीने 1 जागेवर उमेदवार दिला आहे. महायुतीकडून भाजप 18, शिंदे गट 16 आणि अजित पवार गट 2 जागांवर उमेदवार देत आहे. मुंबईतील 25 जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील रिंगणात आहे.
मनसेचे उमेदवार आणि मतांचे विभाजन
मनसेच्या उमेदवारांमुळे महायुती आणि महाविकासआघाडी या दोघांचे आव्हान वाढले आहे. मुंबईत मराठी मतदारांच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे, कारण मनसेने 25 उमेदवार उभे केले आहेत.
Latest: