कुरकुरे खाण्यासाठी फोडले तीन दुकान, चोरीची रक्कम ऐकून व्हाल थक्क
चोरी, घरफोडी म्हंटलं कि तुमच्या डोक्यात मोठे नुकसान असा येत असेल. अशा चोरीची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. आपल्या आजूबाजूला किंवा बातम्यांमधून चोरीच्या घटना कानावर पडतात. पण सध्या एका चोरीची सर्वात जास्त चर्चा आहे. याचं कारणही तसंच आहे. ज्या कारणासाठी चोरी करण्यात आली आहे आणि जितकी चोरी करण्यात आली आहे, दोन्हीही विचित्र आहे
जर तुम्हाला असा कळलं कि तब्बल तीन दुकान फोडून एकाने फक्त वीस रुपयाची चोरी केली, ते तुम्हाला खरे वाटणार नाही, तुम्हाला आश्चर्य वाटेल एका चोरट्याने तीन दुकानं फोडून फक्त 20 रुपयांचीच चोरी केली आहे. चोरीचं कारणही तितकंच विचित्र आहे. ही चोरी चक्क कुरकुऱ्यांसाठी करण्यात आली आहे. पाऱ्यांनी सकाळी पाहिलं तर त्यांना चोरी झालेलं पाहून धक्काच बसला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ते चोरापर्यंत पोहोचले. त्यांनी चोराच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा तेसुद्धा हैराण झाले.
असिफ असा या चोरच नाव आहे. त्याने २० रुपयाची चोरी केली कारण त्याला कुरकुरे खायचे होते, हाती आलेल्या माहिती नुसार असिफ हा मानसिक रोगी आहे. लीस उपनिरीक्षक उदय सिंह यांनी सांगितलं की, त्याला काही विचारलं तरी तो नीट सांगू शकत नाही. तो नीट बोलू शकत नाही. त्याने एकाच रात्री तीन दुकानांचं टाळं तोडल्याचं सांगितलं. त्याला उपचाराची गरज आहे. आता त्याच्या घरातल्यांना बोलवून त्याच्यावर उपचार केले जातील.